ऑगस्ट २००९

११. आत्मस्पर्श

ह्यासोबत

श्री निसर्गदत्त महाराजांच्या काही अप्रकाशित प्रवचनांचे संकलन 'आत्मस्पर्श' या नांवाने प्रसिद्ध करायचे होते त्या साठी एक अभिनव कल्पना मांडली गेली होती.  या पुस्तकाचे कव्हर (फ्रंट आणि बॅक) आतल्या प्रवचनांच्या तोडीचे असावे  आणि त्या कव्हर वरून पुस्तकात काय आहे याची उत्सुकता निर्माण व्हावी. हा बहुदा मराठीतला पहिलाच प्रयोग असावा.  तुमच्यासाठी ते कव्हर :

(फ्रंट कव्हर)

१) आत्मस्पर्श म्हणजे स्वतःचा स्वतःला झालेली स्पर्श!

२) आत्मस्पर्श म्हणजे मृत्युपलिकडे नेणारा बिंदू! मृत्युत जेंव्हा शरीर झोपी जाईल तेंव्हा साथ देणारा सखा.

३) आत्मस्पर्श म्हणजे कुठेही आणि केंव्हाही एकसारखा वाटत राहणारा अल्हाद!

४) आत्मस्पर्श म्हणजे ही- आत-बाहेर, इथे-तिथे, सदा-सर्वकाळ व्यापून राहिलेली निर्वैयक्तीक उपस्थिती!

५) आत्मस्पर्श म्हणजे सर्व सृजनाचा केंद्रबिंदू!

६) आत्मस्पर्श म्हणजे ज्याने कधीही काहीही केले नाही पण जो सगळ्या क्रियांचा आधार आहे असा अकर्त्ता !

७) आत्मस्पर्श म्हणजे सर्व शृंगाराची परिसीमा, सर्व अभिलाषांचे कारण आणि सर्व अभिलाषांचे उत्तर!

८) आत्मस्पर्श म्हणजे तुम्ही स्वतःला प्रेमानी मारलेली मिठी आणि सुरू झालेला जीवनाचा उत्सव!

(बॅक कव्हर)

१) आत्मस्पर्श या एका शब्दानं तुम्ही स्वतःला बिलगता!

२) सत्य खरं तर डोळ्यासमोर आहे पण दाखवता येत नाही.

३) सत्य म्हणजे सघन शांतता, ती शब्दात व्यक्त करण्याचा हा प्रयत्न!

४) सत्य म्हणजे निराकार व्यापकता जी आपण स्वयेच व्हावं ही प्रत्येकाची अभिप्सा!

५) सत्य म्हणजे प्रेम आणि प्रेम म्हणजे स्वतःची स्वतःशी एकरूपता!

६) सत्य म्हणजे संपूर्ण मोकळीक : दैहीक संवेदनां पासून आणि मनाच्या कल्लोळां पासून!

७) सत्य म्हणजे अंर्त-बाह्य परिपूर्णता आणि न्यून शून्यता!

८) सत्य म्हणजे अस्तित्वाचा मूळ स्वभाव : निव्वळ असणं आणि जाणणं!

९) सत्य म्हणजे आपणच सगळीकडे असल्याच्या आणि  आपण कुठेही नसल्याचा एकाच वेळी झालेला उलगडा! 

१०) सत्य म्हणजे सदैव चालू असलेला हा अत्ताचा लोभस क्षण!

११) सत्य म्हणजे निर्भयता : मृत्यू पासून आणि लोकलज्जे पासून!

१२) सत्य म्हणजे आपणच, म्हंटलं तर आहे आणि म्हंटलं तर नाही असा क्षणोक्षणी काजव्या सारखा चमकणारा विस्मय!

१३) सत्य म्हणजे मूळातच असलेले स्वतंत्र्य, स्वतःविषयीच्या सर्व कल्पनांपासून स्वतःची मुक्ती!

१४) सत्य म्हणजे 'कळतय सगळं पण होत काही नाही' अशी चित्रपट पाहत असल्या सारखी झालेली सुंदर अवस्था ! 

१५) सत्य म्हणजे आपल्याला काहीही होत नाही हे कळल्यावर जगण्यात येणारी मौज आणि उपलब्ध झालेले बहुरंगी पर्याय!

१६) आत्मस्पर्श म्हणजे तुम्हाला तुमच्याशी एकरूप करून नाहीसं करून टाकणारी जादू!

Post to Feedशून्य..
शून्य...
निसर्गदत्त महाराज
आपणच सगळीकडे असल्याच्या आणि आपण कुठेही नसल्याचा
शब्दांचे बुडबुडे (माझ्या मते)
एकाच वेळी सगळी उत्तरे देतो
पूर्ण सहमत आहे
भूषणजी धन्यवाद!
आत्मस्प्सर्श
जयंता, व्हॉट अ सर्प्राईज!
प्रश्न
प्रिय उन्मेश
प्रश्न

Typing help hide