काल गडबड होणार अशी चिन्हे दिसू लागली आणि ऑफिस मधून लवकर बाहेर पडायला मिळाल.
दुकाने सगळी बंद. शटर्स खाली. रिक्शा रिकाम्याच धावताहेत. घाईघाइने शाळांकडे जाणारे पालक. सगळीकडे एक तणाव.
जरा वेळ गेला आणि पुन्हा सगळ सुरु.
सगळ बघीतल, आणि वाटल, हे अस का?
कोणीतरी , काहीतरी बोलतो,करतो, आणि सगळ्या समाजाला वेठीला धरल जात. हे बोलल, केल, ते चुक की बरोबर ह्याची सगळेजण चर्चा करतात, वाद होतात पण ह्याचा परिणाम ज्यांच्या वर होतोय त्यांचे काय?
काल नाशिक ला ५५ वर्षांचे एक ग्रुहस्थ दंगलीत म्रूत्युमुखी पडले, त्यांचा काय दोष होता? आता सगळे त्यांच्या घरच्यांचे सांत्वन करतील, १/२ लाख मदत जाहीर होईल, एखाद्या मुलाला नोकरी मिळेल, पण त्यांचा एक आधार कायमचा गेला ना!
जरा खुट्ट झाल, की दुकानदारांना दुकाने बंद करावी लागतात. जरा उशीर झाला, तर .... ( मागे अशाच प्रकारच्या एका घटनेत, एका सोनाराला दुकान बंद करायला वेळ लागला आणि जमाव घुसला की त्याच्या दुकानात. बिचारा रडत, रडत लोकांच्या हाता पाया पडत होता, पण समोर एवढा माल असतांना कोण त्याचे ऐकणार ? )
हे जे फॉलोअर्स असतात, त्यांना नीट महित तरी असत का की हे सगळ कशासाठी चालू आहे? कुठे तरी एखाद्या पुतळ्याला चपलांचा हार घातला जातो आणि काय बोलावे! तो पुतळा ज्याचा आहे, त्याच्या बद्दल थोडी तरी माहीती असते का ह्या दंगल करणार्याना?
हे असे प्रकार गेल्या काही काळात वरचे वर घडू लागले आहेत ! हे समाजाचे स्वास्थ्य बिघडवणारे आहे. कोणी ही उठाव आणि गाव, राज्य बंद पाडाव, बसेस जाळून, तोडफोड करून ( एकाप्रकारे आपलच ) नुकसान कराव. हे सगळ कुठे तरी थांबयलाच हव.
काय वाटत तुम्हाला ?
( टिप : वरील लिखाण कोणत्याही राजकीय पक्षाला उद्देशून केले नाही. )