लाकडाचा ठोकळा

सुमित लाकडाच्या छोट्या-छोट्या वस्तू बनविण्याच्या कारखान्यात कामाला होता. बरेच दिवस ह्या करखान्यात काम थंड होते, अचानक एकदा त्या कारखान्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली.

कामाचे स्वरूप असे की त्यांना दिल्या गेलेल्या सारख्या दिसणाऱ्या शे-पाचशे लाकडाच्या फळ्यामध्ये तीन वेगवेगळे आकार कोरायचे होते. वर्तुळ, त्रिकोण आणि चौरस. यात मेख अशी होती की वर्तुळाचा व्यास, त्रिकोणाची उंची आणि चौरसाच्या बाजू ह्या एकाच मापाच्या होत्या. फळ्या कोरण्याचे काम तर पटापट होत होते परंतु प्रत्तेक आकाराची आतिल बाजू मोजून पाहाण्यात वेळ जाउ लागला. ह्यावर उपाय म्हणून त्याने लाकडाचा एकच ठोकळा असा बनवला (ज्याला इंग्रजीत आपण गेज म्हणतो) की ज्याच्या साहाय्याने त्याला कोरलेले तिनही आकार पटापट तपासता येउ लागले. ठोकळा असा होता की फळीतल्या प्रत्तेक आकाराच्या आतल्या बाजू घासून आरपार जाउ शकत होता. ज्यामुळे त्याला प्रत्तेक आकार अचुक आहे कि नाही याची खात्री पटू लागली.

कुणी सांगू शकेल, सुमितने बनवलेला हा लाकडाचा ठोकळा कशा आकाराचा होता?