सहज सुचलं म्हणून
इंग्रजी मध्ये Tandem Songs हा शब्द प्रचलित आहे. म्हणजे एकच गाणे पण दोन किंवा अधिक गायक/गायिकांनी अलग अलग गायिलेले. एकाच चित्रपटातील असले पाहिजे असे नाही किंवा गैरफिल्मीही असू शकते. मराठीत अशा गाण्यांना काय म्हणतात? उदाहरणार्थ. हा संत तुकारामांचा अभंग. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती , सुमनताई आणि लतादीदी या दोघींनीही वेगवेगळ्या चालीत गायिला आहे. तसेच त्या तिथे पलिकडे, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही गीते.
हिंदीत तर अशी असंख्य गाणी आहेत. (सुमारे १०० तरी माहित आहेत)
उदा.
तेरी आंखोंके सिवा दुनिया में रक्खा क्या है (लता/रफी),जीवन के सफर में राही. (लता/किशोर), तुम बिन जाऊं कहां (किशोर/ रफी)
मराठीत अशी गाणी कमी आहेत. दोन किंवा अधिक गायकांनी गायलेली नाट्यगीते बरीच आहेत , त्याव्यतिरिक्त मराठीतील अशी काही गाणी मिळू शकतील का?