प्रेम आणि विवाह

पहिलं तर प्रेम करून ते विवाह पर्यंत यशस्वी करणाऱ्या सर्व प्रियकर आणि प्रेयसीच अभिनंदन. प्रेम करताना भांडणतर होतच राहतात ती तर लग्नानंतर पण होतात.या भांडणात भरपूर काही गमवलेल्या प्रियकर आणि प्रेयसीचे मी पाहिलेले तीन प्रकार.

१.या भांडणात स्वतःला गमवलेल्या प्रियकर आणि प्रेयसी बद्दल

२.भांडणात गमवून हि पुन्हा प्रेम मिळवणाऱ्या प्रियकर प्रेयसीबद्दल.

३.प्रेमात लग्नासाठी हट्ट करणाऱ्या प्रेयसी बद्दल.

पर्वाच एका बिल्डिंगांमध्ये राहणाऱ्या मैत्रिणी बरोबर घडलेली घटना कानावर आली.

साधारण दोन महिन्या अगोदर तिचा प्रियकर तिच्या घरी मागणी घालण्यासाठी गेला.तसं कॉलेजच्याच वयातली दोघ त्यामुळे मुलीच्या वडलांचा हेतू कोण तो मुलगा एवढंच बघण्यासाठी बोलवलं असेल.तो मुलगा तिच्या घरी गेल्यानंतर जवळ जवळ एक तास चर्चा चालू होती अस ऐकण्यात आलं.यात शेवटच्या क्षणापर्यंत वडील तयार होते अस मुलीच म्हणणं.आणि त्या मुलाचा विषय संपवण्यासाठी वापरलेलं शेवटच वाक्य म्हणजे तुमची मुलगी माझ्या बरोबर एक दिवस एकाच खोलीत होती त्यामुळे तुम्हीच ठरवा आणि तुमच्या कडे काहीच पर्याय नाही आहे आमचं लग्न लावून देण्या शिवाय.झालं इथेच पूर्णं चित्र बदलल तिच्या वडिलांनी मुलाला घराबाहेर हाकलवलं आणि तुमचं लग्न आता शक्य नाही अस सांगितलं आणी तो गेल्यानंतर मुलीला मार मार मारलं.तिचे फोन बंद केले बिल्डिंग मध्ये हि सर्वांशी बोलणं बंद केलं.

महिन्यानंतर त्या मुलाने आत्महत्या केली.

महिनाभर त्या मुलाने भरपूर गयावया केली माफी मागितली पण त्याच बोलणं तिच्या पर्यंत पोहचायचं नाही. दोन दिवसा अगोदर बिल्डिंग मधल्या एका मुलीबरोबर त्या मुलाच फोनवर बोलणं झालं की तो तिच्या शिवाय जगू शकत नाही वगैरे भरपूर काही पण यावर कोणाकडे काहीच मार्ग नव्हता आणि काहीच उपाय नव्हता.

ती मुलगी सध्या अशीच एकटी एकटी राहते कोणात मिसळत नाही बोलत नाही.

२. यात कॉलेजच्या विश्वात माझा हि प्रेमभंग झाला होता.यात  माझा हट्ट एका प्रेमविवाहाला विरोध असणाऱ्या मुलीच्या घरी प्रेमविवाह करण्याचा.यात एक वर्षानंतर त्या मुलीने पुढे शक्य नाही म्हणून माघार घेतली. या प्रेमभंगामुळे पुढचं एक वर्ष तरी सिगरेटच्या धुरात आणी फ़्लटिंगच्या विश्वात गेलं.

मी बदलण्याच कारण म्हणजे वाचनाची आवड आणि त्यावेळी प्रवीण दवणे यांची वाचलेली सावर रे पुस्तके. सध्या असलेल्या प्रेयसीकडून प्रेमभंगाची अपेक्षा नाही कारण दोघांच्या घरातून परवानगी आहे. 

३. माझ्या एका मित्राची प्रेयसी त्याच्याकडे लग्नाची फार मागणी करत आहे आमच्यापेक्षा  ३-४ वर्षाने मोठे म्हणजे  २७वर्षाचे असतील दोघे.

यात मित्राच लग्न न करण्यासाठी फालतू कारण आहेत.उगाच पुढे ढकलतो आहे त्याची कंपनी मुंबई बाहेर राहिला वेगळं घर सर्व काही देत आहे. आणि लग्न करून गेला तर त्याच सर्व सोयी देत आहे. तरी म्हणे मंगळ आहे दोन वर्षात लग्न केलं तर दोघांना त्रास होणार. अंगठी घातल्यावर तो त्रास जाईल पण दुसरा प्रश्न आईला कस सांगणार. सगळे लहान मुलाचे प्रश्न.

याच आधारावर दुसरं उदाहरण म्हणजे मुलीच्या आईवडीलांनी एक दोन वर्ष थांबून मुलीच लग्न दुसरीकडे करून दिल. मुलगा बसला करियर करत.

या सगळ्या वरून प्रेमासाठी वाटेल ते करून त्याला लग्नापर्यंत यशस्वी करणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीचे पुन्हा एकदा अभिनंदन.