कुठे बरं वाचलंय हे? -४

परवा ज्येष्ठ महिन्यात पुण्यामध्ये जलप्रलय झाला आणि लोकांचे प्रचंड नुकसान झाले. हजारो घरे बुडाली. चिखल, राड, घाण यांनी सर्व पुणे शहर भरून गेले आहे, इत्यादी बातम्या बाहेर पसरल्या तशी सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली. आपल्या -----त तर अर्थातच फारच गोंधळ उडाला. त्याचे कारण अगदी उघड होते. एक तर, ----- हे गाव तसे लहान असले तरे पुण्यापासून अवघे सव्वाशे दीडशे मैल अंतरावर होते. तेव्हा पुण्यातल्या हाहाःकाराचा परिणाम -----त होणे स्वाभाविक होते. पुणे आणि ----- हे दोन महत्त्वाची गावे, शिवाय पाण्यानेच जोडली गेलेली होती. पुण्याची मुळामुठा पुढे भीमेला मिळते. या भीमेला नंतर नीरा नदी सामील होते. त्या नीरा नदीच्या काठाने पाचपंचवीस कोस गेल्यावर खळखळीचा ओढा ०००००जवळ नदीला मिळतो. या ओढ्याला जे इतर ओढे मिळाले आहेत त्यातच ~~~चा ओढा आहे. या ~~~च्या ओढ्यातच -----चा ओढा एकदम घुसलेला आहे. त्यामुळे पुणे आणि ----- ही पाण्याने जोडली गेलेली गावे आहेत याबद्दल निदान -----त तरी कोणाचे दुमत नव्हते. एक पावसाळ्यातले महिना दोन महिने सोडले तर एरवी या ओढ्यांना अजिबात पाणी नसते म्हणून, नाहीतर एखाद्या नावेने हे दळणवळण सहज चालू ठेवता येईल अशी वस्तुस्थिती होती. त्यामुळे -----च्या लोकांत या जलप्रलयाची वार्ता कळल्यावर फारच खळखळ उडाली. हे पुण्याचे भयंकर पाणी -----त येऊन आपलेही गाव पाण्यात बुडून तर जाणार नाही अशी भीती नेहमीप्रमाणेच या लोकांना वाटावी हे स्वाभाविक होते; व या खळखळीचे आणखी एक कारण होते. -----तल्या अनेक मंडळींची नातीगोती पुण्यात होती. ही नातीही काही लांबची नव्हती, जवळचीच होती. ११ १११चा सख्खा मावसमेव्हणा मुंढव्याला हमाल होता. २२ २२२२च्या चुलतभावाचे पुण्यात वर्षासहामहिन्यांनी जाणेयेणे होते. ३३ ३३३च्या साडूचे घर पुण्यातच कोठे तरी होते आणि ४४४४ ४४४चे जरी नात्यातले कुणी नव्हते तरी पुणे नावाचे एक मोठे गाव आहे आणि तेथे बरीच माणसे राहतात, ही गोष्ट त्याने ऐकलेली होती. ५५ ५५५५ने तर वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी शहर पुणे प्रत्यक्ष पाहिलेले होते. त्यामुळे तर पुण्याबद्दल त्याला इतरांपेक्षा बरीच माहिती होती. इतक्या गोष्टी असल्यावर पुण्यातील हाहाःकाराचा परिणाम -----वर होऊ नये तर काय व्हावे...?

...


कुठे तरी वाचलेलं वाटतं, नाही का हे? कुठे बरं?

वर उतरवलेला उतारा कोठल्या पुस्तकातून घेतलेला आहे?
सांगा बरं!

ह्या पुस्तकाविषयी, त्याच्या लेखक/लेखिकेविषयी, प्रकाशनाविषयी, त्यांच्या इतर पुस्तकांविषयी किंवा ह्याच विषयावरच्या तुम्ही वाचलेल्या इतर पुस्तकांविषयी माहिती दिलीत तर तेही वाचायला आवडेल!

त्यावर तुम्हीही असे कूटप्रश्न विचारावे!

ह्यावेळचे हे कोडे खूप सोपे आहे बरंका. त्यामुळेच मी त्यातली पात्रांची आणि ठिकाणांची नावे गाळली आहेत. पाहूया बरं तुम्हाला त्यातली किती ओळखता येतात ते!