महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी यायलाच पाहिजे : मुख्यमंत्र्यांचे विचार

आजच्या मटाचा हा अग्रलेख आहे.

शीर्षक आहे : विलासरावांचा मराठी बाणा

अग्रलेखात यशवंतराव चव्हाणांपासून आजपर्यंत महाऱाष्ट्रात मराठीची कसकशी प्रगती - अधोगती होत गेली त्याचा थोडक्यात मुद्देसूद आढावा आहे.

त्या अगोदर म.टा. कार म्हणतात .... महाराष्ट्रातील परप्रांतीयांविरोधात राज ठाकरे आणि त्यांची 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' यांनी केलेल्या आंदोलनानंतर महिनाभराने अखेर महाराष्ट्र सरकारला आपली अधिकृत भूमिका जाहीर करणे भाग पडले आहे. 'या राज्यात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे!' अशा निसंदिग्ध शब्दांत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हे धोरण जाहीर केले, तर याच अधिवेशनाच्या प्रारंभी होणाऱ्या राज्यपालांच्या अभिभाषणातही कोर्टाचे कामकाज मराठी भाषेत चालवण्याच्या मुद्द्यावर का होईना, त्यांना मराठी भाषेचीच तळी उचलून धरावी लागली. याचा अर्थ स्पष्ट आहे. उशिराने का होईना सरकारला अखेर जाग आली असून, महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना मराठी भाषेशी वैर करून चालणार नाही, हे आता सत्ताधाऱ्यांच्याही लक्षात आले आहे. ....


आपण सर्वांनी तो अग्रलेख वाचावा व त्यावर येथे उहापोह करावा.

१. कोर्टाचे काम मराठीत चालवण्याचा मुद्दा काय आहे ते कुणाला माहीत आहे का?

२. अग्रलेखात उल्लेखिलेला पदनाम कोश आपल्या पाहण्यात / वाचनात आलेला आहे का?

३. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मराठीच्या दैन्यावस्थेबाबत कोणते उद्गार काढले होते ते कुणाला माहीत आहे का?

४. म. टा. कार म्हणतात त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून त्यांचे मराठी प्रेम व्यक्त होते असे तुम्हाला वाटते का?