मुलांचे खेळणे

शाळेतून आले की कधी एकदा खेळायला जातो असे सर्वच मुलांना नेहमीच वाटते. पण आता खेळ बदलले आहेत. फार मागे  नाही, पण १० -१२ वर्षांपुर्वीपर्यंत (मी लहान असतना) मुले लपंडाव, डब्बा ऐसपैस, टिपिटीपी टीप टॉप, दगड का माती, विशामृत , बारा टप्पे, बिस्किट, खो- खो, शिवणा-पाणी , चोर पोलिस, मधला कावळा, रुमाल-पाणी , कब्बड्डी, आट्यपाट्या,  लंगडी,  मी शिवाजी,अप्पारप्पी इतर हि अनेक खेळ खेळत असू. आता मुळात बाहेर जाउन खेळणेच मुळात कमी झालेले दिसते. टि. व्हि. गेम , कॉंप्युटर गेम, मोबाईल  मुळे मैदानात अगर रस्त्यावर जाउन खेळणे हि संकल्पनाच नष्ट होत चालली आहे. 

त्यातून हि मैदानात जाणे झालेच तर क्रिकेट शिवाय इतर खेळ खेळणे पापच.

दुसरा मुद्दा म्हणजे क्रिकेट शिवाय खेळ झालेच तर त्यात समरसून खेळणे नाही. कपडे खराब न करता व अंग बचाउन खेळणे दिसते. खेळ खेळताना तर "लागेल" हि भीतीच जर अधिक असेल तर तो खेळ कसला?

हे खेळातले अंग बचावणे पुढे जीवनात हि परावर्तित होते. हे बदलण्यासाठी काय करता येईल?

सदस्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षित.