सौख्य

जगण्यात सौख्य आहे...
मरण्यात सौख्य आहे...


मन पाखरू बनावे
उडण्यात सौख्य आहे...


अश्रूंस अर्थ येता
रडण्यात सौख्य आहे...


डोळे मिटून तुजला
बघण्यात सौख्य आहे...


तू जिंकशी म्हणोनी
हरण्यात सौख्य आहे...


जाळे सुरेख ऐसे
फसण्यात सौख्य आहे...


आषाढ मेघधारा
भिजण्यात सौख्य आहे...


हलकेच फुंकशी तू
विझण्यात सौख्य आहे...


आहेस तू तिथे मी
असण्यात सौख्य आहे...


नाहीस तू तिथे तर
नसण्यात सौख्य आहे...