मनोगतावरचा 'जातीयवाद'

(सर्वांना उद्देशून - 'प्रशासकांना'सुद्धा..)


मी नुकताच मनोगताचा सदस्य झालो आहे. इथल्या काही चर्चांचे 'जातीयवाचक' मुद्दे आणि काही चर्चांचे 'जातीयवाचक' प्रतिसाद पाहता, मनोगतासारख्या सुसंस्कृत आणि साहित्य संपन्न ठिकाणी तरी निदान असले काही वादग्रस्त विषय आणि प्रतिसाद मला अपेक्षित नव्हते. मला वाटत होते की मनोगत हे नि:पक्षपणे मत व्यक्त करण्याचे साधन आहे.


याच जातीयवादाने आपल्या देशाची, समाजाची, स्वतःची आणि काही प्रमाणात आपल्या भावी पिढीचेही नुकसान केले आहे. मला या लोकांची कीव करावीशी वाटते. जग कुठे चालले आहे आणि ही लोक अजूनही आपल्या जातीला कवटाळून बसली आहेत. त्याचबरोबर मला दुसऱ्या जातीला नांव ठेवणाऱ्या लोकांचाही तितकाच राग येतो. मला वाटते आपण आता भावीपिढी पुढे आपण 'मानवता' ही एकच जात असल्याचे उदा. घालून दिले पाहिजे.  नाहीतर आपल्या सर्वांची प्रगती इथेच खुंटवेल.


मी या 'मनोगतावरील जातीयवादाचा' जाहीर निषेध करतो. 


तसेच'प्रशासना'स विनंती करतो की 'यापुढे जातीयवाचक लिहिणाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई करावी' आणि 'मनोगतावर लिहिण्याचे नियम आखून द्यावे'. नाहीतर आता मूळ धरू लागलेला हा जातीयवाद पुढे फोफावण्याची शक्यता जास्त आहे. 'प्रतिबंध हाच उत्तम उपाय आहे!'


- मोरू