घटस्फोट भारतीय संस्कृती

      इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोट घेण्याचे प्रमाण बरेच कमी आहे.(आता तेही हळूहळू वाढू लागले आहे) या कमी प्रमाणाचे कारण आपण आपल्या संस्कृतीत(मानसिकता) आहे असे समजतो.पण खरे पहाता आपल्याकडे घटस्फोटाचा कायदा जटील आहे त्यामुळे घटस्फोट मिळणे अवघड जाते‌. स्त्रीला योग्य पोटगी मिळत नाही आणि त्याविषयीचे कायदे तिला अन्यायकारक आहेत हे खरे या घटस्फोटाच्या कमी प्रमाणाचे कारण आहे‍  जर कायद्यात योग्य सुधारणा झाली तर हा भ्रम दूर होईल असे वाटते.मग लग्नबंधनातून सुटू पहाणारे यदृच्छया त्यातून सुटतील.पण असे होणे योग्य ठरेल का?