कृपया ऑर्कूट विषयी थोडी माहिती हवी

आदरणीय मनोगतींनो,


माझी बरीचशी अकाउंट्स मित्रांनीच काही काळ हॅक केली होती बहुधा! असो.


मला आपणा सर्वांची थोडी मदत हवीय. ऑर्कुटबाबत


१) ऑर्कुट हे नाव कसे पडले


२) सोशल नेटवर्किंग साईट्स म्हणजे नेमके काय? त्या कधी सुरू झाल्या? त्यात काही भारतीय खासियत असलेल्या अशा साईट्स आहेत का?

शब्द साधना - ३.

कृपया मराठी शब्द सुचवण्याचा प्रयत्न करू या. कोणी शब्द सुचवला असेलच तर त्याला जास्त समर्पक शब्द सुचवला तरी चालेल.



  1. थोडे डिटेल्स सांगशील.
  2. मला डिपॉझिट ठेवायचे आहे, इंटरेस्ट रेट काय आहे?

संत गाडगे बाबा... - एक थोर संत

इथे पहा - दै‌. सकाळ








 


 


 


 


गाडगेबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त (२० डिसेंबर) त्यांना भावपुर्ण आदरांजली.

वाद - विवाद १

रस्त्यावर फिरताना जेव्हा तुम्ही मुलीन्ना सिगारेट ओढताना बघता तेव्हा तुम्हाला नक्की काय वाटते?


१. व्वा! क्या बात है!


२. अरेरे! काय हे?


३. आपल्याला काय त्याचे?


४. इतर काही...

त्रिशंकू!!


          कॉफी मशीनजवळ चार टवाळांचा खिदळण्याचा आवाज आला आणि तो वैतागला. मनातल्या-मनात एक दोन शिव्या घालून त्याने आपल्या कामात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला. "साले एक तर उशिरा ऑफिसला येतात आणि त्यानंतरही असाच टाईमपास करत राहतात. कधी वेळेवर काम करायची बोंब." तसे त्याला त्यांच्यावर चिडायचे काही कारण नव्हते, तेही त्याच्याच देशातले, त्याच्यासारखेच नोकरीसाठी इथे राहिलेले. शिवाय त्यांनी आजपर्यंत कामात कुठेही चूक केली नव्हती. त्यामुळे त्याला फारसे बोलताही यायचे नाही.फरक फक्त एवढाच होता की तो आता जवळ-जवळ अमेरिकनच झाला होता तो काम करत असलेल्या कंपनी सारखाच. आणि या खिदळणाऱ्या, एका भारतीय कंपनीकडून आलेल्या लोकांचा तो साहेब झाला होता.तिकडून हसण्याचा आवाज वाढतच होता. शेवटी त्याने संगणकाला कुलूप लावून खिडकी समोर येऊन उभा राहिला. त्याची ती आवडती जागा होती. त्या खिडकीतून बाहेर पाहत त्याने कितीतरी गोष्टींवर विचार केला होता. पण आज त्या खिडकीतूनही फक्त सगळीकडे बर्फच बर्फ दिसत होते. प्रत्येक वस्तूवर एक प्रकारचा थंडपणा आला होता.इथली थंडी त्याला बऱ्याच जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायची. त्या दिवसांची जेव्हा तो नुकताच इथे आला होता....

मेतकूट भात (वेगळा प्रकार)

वाढणी
२-३

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • बासमती तांदुळ- २ वाट्या
  • मेतकुट - ३ चमचे
  • फोडणीसाठी तेल,मोहरी,जीरे
  • लिंबु- १
  • चवीनुसार मीठ, तिखट
  • साखर- अर्धा चमचा

मार्गदर्शन

भात मोकळा शिजवून घ्यावा. भाताची वाफ गेल्यावर(पण भात गरम असावा) चमच्याने शिते मोकळी करावीत,त्यावर मेतकूट,तिखट,मीठ,साखर घालावे,दुसऱ्या  पातेल्यात फोडणी करून,ही फोडणी भातावर घालावी,लिंबू पिळावे व सर्व एकत्र करावे.

 

पर्वणी

आपण एखादी गोष्ट करायची असे मनात ठरवतो पण प्रत्यक्षात ती करू शकत नाही असे बरेचदा होते. त्या वेळेस ते नशीबातच नव्हते असे दैववादी म्हणतील तर तुमचे प्रयत्न पुरेसे नव्हते असे प्रयत्नवादी सांगतील. अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर ती गोष्ट साध्य झाली तर त्यातून जास्तच आनंद मिळतो. अशीच एक पर्वणी नुकतीच गाठायला मिळाली. पहायला गेल्यास हा महोत्सव गेली त्रेपन्न वर्षे नियमितपणे साजरा होत आला आहे. गेली तीस पस्तीस वर्षे मुंबईहून येऊन त्यात सहभागी होणारे काही महाभागसुद्धा आम्हाला तिथे भेटले. दरवर्षी संक्रांतीला तिळगुळ वाटावा किंवा दिवाळीला फटाके उडवावेत इतके ते त्यांच्या अंगवळणी पडले आहे.

माझी शाळा

आंबेडकर चौकातून थोडं पुढे गेलं की खंडेलवालचं सुप्रसिद्ध दुकान लागतं, त्याच्या समोर 'प्रधान बिल्डिंग' मध्ये आमची शाळा भरायची. छोटीशीच टुमदार इमारत,मैदान किंवा पटांगण म्हणता सुद्धा येणार नाही असं छोटसं अंगण आणि ५,६ खोल्यांमध्ये भरणारे वर्ग असं अगदी घरेलू स्वरुप होतं.
माझं नाव शाळेत घालायला आई घेऊन गेली मला के.बी.

मरणा, काय तुझा तेगार!

तेगार हा एक अस्सल कोल्हापुरी शब्द आहे. तेगार म्हणजे तोरा, मस्ती. 'अवकाळी पावसानं घट्मुट झालेली जमीन बगून यदुबा मनात म्हनाला, "काय तुजा तेगार! माजं हौशा-नकऱ्या दोन तासात उलटंपालटं करुन टाकत्याल तुला!" अशा संदर्भात तो वापरला जातो. हौशा-नकऱ्या ही बैलांची नावं.

मृत्यूची भीती ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भीती समजली जाते. माणसाला सगळ्यात जास्त कशाचं भय वाटत असेल तर ते मरणाचं. इतक्या वेळा 'आनंद' बघूनही काही माणसं अशी मृत्यूच्या सावलीनं काळवंडलेली आयुष्यं जगत असतात. आयुष्याचा उतार लागलेली काही माणसं तर मरणाच्या कल्पनेने केंव्हाच मरून गेलेली असतात.

सहजच...

अथक प्रयत्ना नन्तर मनोगत वर लिहिता येत आहे. ईथे इन्ग्लिश कसे लिहावे आणि अशुद्ध कसे लिहू नये हे समजत नाही. कदाचित सवयीने येईल, हळूहळू.


असो. हे लिखाण मला मराठी ब्लॉग वर देखील वाचता येईल का? कसे.


प्लीज हेल्प.


थॅन्क्स.