आमचा मुख्य साहेबही एक सरदारजी होता. तो फिरतीच्या नोकरीवर असायचा आणि फक्त महिन्यातून दोन दिवस कंपनीत असायचा. आता मला 'शेक्रेटरी' बनून दोन आठवडे झाले होते. इन्व्हॉइस,चलने,बिले बनवणे,हिशेब पाहणे,फोन घेणे, या विसंवादी कामांवर बऱ्यापैकी सराव झाला होता. आठवडी सुट्टीत नोकऱ्यांच्या मुलाखती देणेही जोरात चालू होते.