मेजवानी आणि अनुवादित पुस्तके

मेजवानी आणि अनुवादित पुस्तके

नमस्कार,
परदेशात आल्यावर अचानक निरनिराळ्या देशांतले लोक एकदम भेटायला लागले आहेत. सर्व काळ भारतातल्या एकाच गावात काढलेल्या माझ्यासारख्याला हा अनुभव फारच मजेदार वाटतो. मागच्या रवीवारी सायंकाळी आमच्या प्राध्यापकांनी त्यांच्या घरी मेजवानीस बोलावले होते. प्राध्यापकांच्या 'कार्यचमु' मधील आम्ही सर्व दहा पंधरा जण त्यांच्या घरी जमणार होतो.

पर्यटन: मस्ती...आणि थोडी धास्तीदेखील!

सुट्टीच्या पर्यटनाचा उद्देश काय असतो? (सुट्टीचे पर्यटन: व्हेकेशन, किती साधा शब्द! आपल्याकडे ही संकल्पनाच नव्हती त्यामुळे त्यासाठी शब्द देखील नसावा.) चार घटका आपल्या रटाळ दिनक्रमातून बाजूला काढून कुठेतरी जाऊन मजा करणे, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेणे, सगळ्या चिंता, दुखणी विसरून मनाला आणि मेंदूला विश्रांती देणे, काही दिवस एंजॉय करणे आणि मन आणि मेंदू तजेलदार झाल्यानंतर पुन्हा नवीन उत्साहाने आणि जोमाने आपापल्या कामाला लागणे! अस्मादिक पण एकदा ही भाबडी कल्पना डोक्यात घेऊन महाबळेश्वरला गेले. तसं पाहिलं तर फिरायला जाणे, हॉटेलवर राहणे याचा अनुभव गाठीशी आहे पण या खेपेस जरा प्रकर्षाने काही गोष्टी जाणवल्या. महाराष्ट्र टुरिझम डेवलपमेंट कॉर्पोरेशन (एमटीडीसी) च्या संकेतस्थळावर जाऊन त्यांच्या विश्रांतीगृहाचे (रिसॉर्ट) आगाऊ आरक्षण करावे या हेतूने तिथून त्यांचा दूरध्वनी क्रमांक घेऊन आम्ही फोन लावला.

खरे अल्पसंख्याक कोण?

काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच कोणते ना कोणते कारण काढून जात, धर्म या विषयावरून राजकारण पेटते आहे, पेटवले जात आहे. सत्ता काँग्रेसची असल्याने हे अपेक्षीतच होते. पण आता सगळ्याचा अतिरेक होतो आहे असे वाटते आहे.
भारतात जो तो उठून स्वतःला अल्पसंख्याक म्हणवून घेतो आहे. अल्पसंख्याक असण्याची नेमकी व्याख्या काय आहे? की ज्यांना बहुसंख्य म्हटले जाते तोच समाज आता अल्प राहिला आहे? भारताचे असे नक्की किती तुकडे केले म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा हक्क मिळेल? काही पक्षांना धर्मांध ठरवून, सतत जातीचे अन धर्माचे राजकारण पेटते ठेवणारे स्वतःला निधर्मवादी म्हणतात हे योग्य आहे का?
या सगळ्यात भारताचे भविष्य काय? आम्ही स्वतःच गुलाम बनलो आहोत काय राजकीय स्वार्थाचे? भारताच्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर हक्क सांगणारे नेहमीच अल्पसंख्याक  असतात. या सगळ्यावर स्वतःच्या मार्गाने तोडगा काढून भारता बाहेर जाणारे जिथे जातील तिथे अल्पसंख्याक म्हणवले जातात. पण मग खरे अल्पसंख्याक कोण?

माझा नोकरीविषयक प्रवास!-१

२००१ सालची गोष्ट. 'वर्ल्ड ट्रेड सेंटर' नुकतेच पडले होते. भारतीय आय.टी. आणि इतर कंपन्या तात्पुरत्या मंदीत जाणार अशा अफवा उठत होत्या. अशा या सुमुहूर्तावर आमची स्वारी नुकतीच इंजिनियर होऊन नाना माध्यमांनी नोकऱ्या शोधत होती.


३-४ वर्षांपूर्वीपर्यंत ताज्या इंजिनियरांना नोकऱ्या शोधायची माहिती असलेली पहिली पायरी म्हणजे सरकारी/निम सरकारी नोकऱ्या. म्हणून 'एम्प्लॉयमेंट न्यूज' चा हर आठवड्याचा अंक भक्तिभावाने मिळवणे आलेच. माझ्यासारखाच विचार माझ्या आसपासचे बरेच ताजे इंजिनियर करत असल्याने बुधवारी 'एम्प्लॉयमेंट न्यूज' चा अंक आल्याआल्या एक तासात संपायचा. असे दोन बुधवार झाल्यावर मग पेपरवाल्याकडेच दर बुधवारचा रतीब सुरू केला.अमक्या पानावर तमक्या बाजूला असलेली (एअर इंडिया/टीआयएफआर/डिआरडिओ वा तत्सम भव्य ब्रँडनेमची) जाहिरात पाहिली की मग मैत्रिणींना फोनाफोनी सुरू. 'अगं,महत्वाची जाहिरात आहे. तू माझ्या घरीच ये. आपण दोघी मिळून अर्ज पाठवू.' 'एम्प्लॉयमेंट न्यूज' च्या जाहिरातींना अर्ज पाठवणे हे एक चिकाटीपूर्ण काम असायचे. २४.५ बाय १७ सेमीचे पाकीट, २५०/१२५/१००/३००/५०० रु. चा डी. डी., जाहिरातीत दिलेल्या नमुन्याबरहुकूम अर्ज संगणकावर तयार करून प्रिंट करून घेणे आदी अनेक उपकामे त्यात दडलेली असायची. (हे अर्ज अप्पा बळवंत चौकात आयते अमुक बाय अमुकच्या लिफाफ्यासह व जाहिरात, प्रिंट केलेला अर्ज यासह मिळतात, पण पैसे वाचवायचा आणि सर्व स्वतः करायचा आमचा उत्साह उतू जात असायचा.)

गायत्री ऑर नो गायत्री..

प्रसंग बांका होता. 'स्वदेस'ची तबकडी हातात होती. त्यावरची गायत्री जोशीची मोहक छबी खुणावत होती. मग अडचण काय? "अडचण"? पडद्यामागे नियतीमॅडम खिदळल्या. पुन्हा तो मध्ये आला होता. हो, तोच. ज्याच्या डायलॉकबाजीने हे कर्ण किटले होते, ज्याच्या एकसुरी अभिनयाने हे नेत्र विटले होते, ज्याचा मै हू ना.. नको, नकोच ती आठवण.
शेक्सपिअरसाहेब, आपण महान आहात. चारशे वर्षांनंतरही आपले शब्द आठवतात म्हणजे आपण लिहिलेले साहीत्य अभिजात की काय म्हणतात तसे असावे. टू बी ऑर नॉट टू बी? जगायचे की मरायचे? गायत्रीला बघत जगायचे की शाहरुखला बघत (तीळ-तीळ) मरायचे?

ज्योतिष पण येथे चर्चिले जावे का?

मनोगताच्या सगळ्या मांडणी मध्ये,


ज्योतिष असा विषय नाहीये.


(मला दिसला नाही, कुठे असेल तर सांगा!)


या विषयावर अनेक चर्चा होऊ शकतात. तसेच खुपसे जुने संदर्भ येथे येऊ शकतात.


ज्योतिष 'एक फालतूपणा आहे' पासून तर


'त्यात तथ्य आहे' पर्यंत चर्चा, अनुभव त्यात असू शकतात.

नववर्ष २००७ आणि शुभेच्छा कशी द्याल? गर्व से कहो हम.... हैं।

नववर्ष २००७ आणि शुभेच्छा कशी द्याल? गर्व से कहो हम मराठी हैं।


मनोगती किंवा विकिकर असल्याचा अभिमान असलेल्या मराठी मित्र मैत्रिणींनो. नेमेची येतो पावसाळा या नेमाने आपण नववर्षाच्या शुभेच्छांची देवाण घेवाण करत असतो. यात एक प्रमुख नवीनतम माध्यम आहे मोबाईल एस.एम. एस आणि मेसेंजर.  

मॅट्रिक्स रसग्रहण ४

...मॅट्रिक्समध्येच असा एक जीव जन्मास येणार आहे की त्याची सुटका करण्यास माणसाला यश आले तर तो समस्त मानवजातीला यंत्रांच्या जोखडातून मुक्त करू शकणार आहे.. बस्स मॉर्फियसच्या जीवनात आता एकच ध्येय आहे..'त्या'चा शोध घेऊन त्याला मुक्त करणे. 

मॅट्रिक्स रसग्रहण ३

'मॅट्रिक्स' हा असाच एक व्हर्च्युअल रिऍलीटी प्रोग्रॅम आहे. जो प्रत्येकाच्या मेंदूने स्वीकारला आहे. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत मग्न असला तरी नियंत्रण हे शेवटी त्याच्या निर्मात्याकडे आहे.  


-----------------------------------------------------------------

हक्क व कर्तव्य

आजच्या सर्व वृत्तपत्रांत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी "देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा" अशा अर्थाचे विधान केल्याचे प्रसिद्ध झाले आहे.


हक्काबरोबरच मुस्लिमांचे या देशाप्रति (काँग्रेस पक्षाप्रति नव्हे) कर्तव्य काय याविषयीही काही सांगितले असते तर बरे झाले असते असे वाटते.