परत परप्रांतिय

काही दिवसापुर्वी छठपुजा मुंबईत झाली त्यात बोलत होते हमारा भय्या ये काम करताय वो काम करताय . पण मुंबईत का येतोय ते सांगत नव्हते.


बिहार. ऊत्तरप्रदेश इ. राज्यातुन भय्या मुंबईत येतो. का येतो ?


दाक्षिणात्य राज्यातुन लोक येतात . ह्या लोकांचे (खास करुन कानडी)लेडिज बार मुंबईत आहेत . मुंबईतला पैसा ते त्यांच्या गावी गुंतवतात. सीमाप्रश्नाविषयी एक अक्षरसुद्धा बोलत नाही.

सूर्याचे न चालता चालणे - भाग ३ (अंतिम)

सूर्योदयापासून अस्तापर्यंतचे त्याचे पहिल्या प्रकारचे चालणे साध्या डोळ्यांना दिसते यामुळे अनादि कालापासून सर्वसामान्य माणसांनीसुद्धा ते पाहिलेले आहे. दुसऱ्या प्रकारचे बारा राशीमधून त्याने केलेले भ्रमण सुद्धा निदान काही हजार वर्षापासून विद्वानांना माहीत असावे असे पुरातन वाङ्मयातील उल्लेखावरून दिसते. हे दोन्ही प्रकारचे चालणे कशामुळे घडते याचा विचार करून जाणत्या लोकांनी आपापले तर्क व सिद्धान्त वेळोवेळी मांडले असणार. तसेच आकाशाचे नेमके स्वरूप कसे आहे याबद्दल सुद्धा विचार झालाच असेल. आकाश, अवकाश, ग्रह, तारे वगैरेबद्दल मांडल्या गेलेल्या संकल्पनांतून ज्या तत्कालीन किंवा मागून आलेल्या विद्वज्जनांनी मान्य केल्या त्यांचा पुढील पिढीच्या शिक्षणाच्या अभ्यासात समावेश झाला व या प्रकारे ते ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचले.

सूर्याचे न चालता चालणे - भाग २

आकाशातील लक्षावधी चांदण्या कधीही इतस्ततः भरकटत नाहीत, त्या नेहमी एकमेकापासून ठराविक अंतर ठेवून समान वेगाने चालतात व त्यांचे समूह बनवले तर त्या समूहाचा आकार कधीही बदलत नाही असे त्यांचे निरीक्षण करणाऱ्या विद्वानांना दिसले. त्यांनी आकाशाच्या संपूर्ण गोलाची संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या बारा भागात विभागणी करून प्रत्येक भागाला त्या भागात दिसणाऱ्या तारकांपासून बनू शकणाऱ्या आकारांची मेष, वृषभ इत्यादी नांवे दिली. बारा राशींचे हे नामकरण करणाऱ्या विद्वानांची कल्पनाशक्ती अचाट असणार. निदान मला तरी वृश्चिक राशीतील विंचवाची नांगी सोडली तर बकरा, बैल, सिंह वगैरे प्राण्यांचा भास कधी झाला नाही. पण असामान्य कल्पकतेने चांदण्यांच्या समूहांच्या अमूर्त आकारांना मूर्त रूपे देऊन त्याच्या आधाराने त्यांनी आकाशाचा एक नकाशा निर्माण केला व खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग करून घेतला.

कार्ल मार्क्स -एक तत्त्वज्ञान

मार्क्सवाद  नैसर्गिक तत्त्वावर विश्वास ठेवतो.मार्क्सवादाने आत्म्याचे  अस्तित्व मान्य केलेले नाही.मार्क्स म्हणतो  आजपर्यंतचा इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे. मार्क्सवादी आदर्श समाजाची घडण करण्यास क्रांति किंवा हिंसात्मक पद्धतीला आवश्यक मानतात.कारण त्यांच मत असे की  क्रांतिद्वारे लगेच फलप्राप्ती होऊन त्या द्वारे विरोधी तत्त्वांचा लगेच नाश होऊ शकतो.मार्क्स धर्माला अफ़ूची गोळी मानतो. कार्ल मार्क्स म्हणतो साम्यवादी रचना अंमलात आल्यावर मजुर व मालक असे संबंध राहणार नाही. आणखी बरेच काही  .

सूर्याचे न चालता चालणे- भाग १

खगोलशास्त्रामधील नवनव्या घडामोडींची माहिती देणारे अभ्यासपूर्ण लेख तज्ज्ञ मंडळी लिहीत असतात. या शास्त्रामधील काही महत्वाचे शोध आधी कोणी लावले यावर अनेक वेळा वादविवाद होत असतात. "सूर्याचे न चालता चालणे" हा ज्ञानेश्वरीमधील एका ओवीचा भाग या संदर्भात उद्धृत केला जातो. हे चालणे कसकशा प्रकारचे असते याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहे.

छोटीशी आत्मकथा !

काही वर्षांपूर्वी माझा जन्म झाला. आईबापाने मला वाढविले. माझे शिक्षण झाले. बऱ्यापैकी खटपट करून मी नोकरी-व्यवसायात स्थिरावलो. यथावकाश लग्नकर्तव्य केले. संसार सुरु झाला. आम्हाला मुलं झाली. त्यांना वाढवले. लहानाचे मोठे केले. शिक्षण केले. नोकरीतून निवृत्त झालो. दोन तीन खोल्यांचे घर केले. मुलाबाळांची लग्नं झाली. नातवंडे बघितली...जगाचा निरोप घेतला....

वाढ दिवसाच्या शुभेच्छा!

मनोगती श्री. नाम्या ह्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,
स्वाती