वाढणी
१पोळ्यांचा डबा भरून शंकरपाळे होतात.
पाककृतीला लागणारा वेळ
120
जिन्नस
- १वाटी रवा,१ वाटी मैदा,१/२ वाटी डाळीचं पीठ,२ टेबल स्पून तूप,
- १/२ वाटी दही घुसळून,तिखट,मीठ,ओवा,जिरे प्रत्येकी१चहाचा चमचा
- तळणीसाठी तेल
मार्गदर्शन
मैदा,रवा,डाळीचे पीठ एकत्र करा,त्यात तिखट,मीठ,ओवा,जिरे घाला व नीट मिसळून घ्या.तूप फेसून त्यात घाला,घुसळलेले दही घाला व कमीतकमी पाणी घालून घट्ट भिजवा.१०/१५ मिनिटे झाकून ठेवा.पोळ्या जरा जाड लाटून शंकरपाळे कापा,तळा.
टीपा