नमस्कार,
काही वर्षांपूर्वी, ओशोंच्या (बहुधा अनुवादीत 'अंतर्यात्रा') पुस्तकात वाचलेली झेन रूपक कथा, आठवेल तशी लिहीत आहे.
एकदा एक तरुण संन्यासी प्रवास करीत असताना, त्याला असाच एक प्रवासासाठी बाहेर पडलेला संन्यासी भेटतो. दोघे एकमेकांना अभिवादन वगैरे करतात आणि पुढचा प्रवास एकत्र करायचा ठरवतात. दुसऱ्या संन्याशाच्या झोळीमध्ये काहीतरी जड वस्तू असते. तो ती झोळी सतत सांभाळतो आहे असे पहिल्या संन्याशाच्या लक्षात येते. रात्री झोपताना सुद्धा तो ती झोळी दूर ठेवायचा नाही. याचे पहिल्या संन्याशाला राहून राहून आश्चर्य वाटत राहते.