काही महिन्यापासून मनोगत वर अथवा जेव्हा पासून मनोगत चालू झाले तेंव्हा पासून विविध क्षेत्रामधील इतर भाषेचे शब्द व त्यांचे मराठी करण हा विषय घोळतो आहे. त्यावर माझे मत.
खरोखरचं ह्या सर्वाची गरज आहे का ? कारण तुम्ही वापरत असलेल्या संकेतस्थळाचेच उदा. ह्या ह्याच्या सर्व प्रणाली English मध्येच कार्य करतात पण प्रदर्शन मराठी असते. जसे की जे शब्द भाषांतरी होउ शकतात ते करा पण जे साध्य नाही अथवा अर्थाचा अनर्थ होईल असे भाषांतर काय कामाचे ? उदा. येथेच मनोगतावर काही शब्द English मध्येच आहेत नाहीतर मनोगत कारांना हे काही अवघड नाही आहे कि त्याचे भाषांतर करणे पाहा. Input Format, HTML, Ctrl_T असंख्य आहेत. , Mobile phone ला दुरध्वनी हा शब्द खरोखरच उपयुक्त आहे पण त्याचा व्यवहारिक उपयोग करता येईल का ? कारण मोबाईल ला फक्त दुरध्वनी बोलल्याने अथवा लिहण्याने काम चालणार नाही त्याच्या सलग्न बाबी तुम्हाला भाषांतरीत कराव्या लागतील. नाही तर एकादे वाक्य योग्य तयार होनारच नाही. ही फक्त उदाहरणे आहेत.