मराठी पिझा

वाढणी
एकच जण खाउ शकेल

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • शिळी भाकरी
  • गोडेतेल
  • गोडा मसाला
  • कच्चा कान्दा, कोथिन्बीर
  • दाण्याचे कूट
  • तिखट, मीठ

मार्गदर्शन

प्रथम भाकरीचा सर्व / पूर्ण पापुद्रा सोडवा

भाकरीला तेल लावा, त्यावर कच्चा कान्दा,तीखट,मीठ,आणि कोथीन्बीर व दाण्याचे कूट पेरा पापुद्रा परत ठेवा व नन्तर फ़्रीज़ मध्ये सेट करा

चौकोनी काप करा आणि खा !

टीपा
मजा करा

माहितीचा स्रोत
स्वत : लाच

सहज सरल सापेक्षता - ५ (अंतिम)

या आधी...


  • सहज सरल सापेक्षता - १
  • सहज सरल सापेक्षता - २
  • सहज सरल सापेक्षता - ३
  • सहज सरल सापेक्षता - ४


    ही आईन्स्टाईनसाठी मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी ठेवली होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोंडून ठेवावंसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!

    आमच्यातलं कुणीसं म्हणालं, "आईन्या, वेड लागलंय तुला. अरे हेच बघ, तू ही ओढ तयार करायची म्हणतोस, ही अशी सूर्यासमोर ठेवायला. तुला ही ओढ म्हणजे काय पोरखेळ वाटते? अरे अशी कोणती ओढ आहे की जी मनात आलं की दिसेल नि मनात आलं की रुसेल? तेही तू 'स्थिर' कशाला म्हणतोस यावरून. ओढ अशी थोडीच असते, त्याला नाईलाज आहे."  आईन्स्टाईन म्हणाला, "हां! हेच तर मी म्हणतोय. ही ओढ आहेच अशी अवखळ, नाटकी." आम्ही म्हटलं, "बस्स झालं आईन्या. हरलास तू. तुझी 'ती' ओढ नाटकीच होती तर." एक कागदाची थप्पी पुढं सारत तो म्हणाला," हे घ्या. वाचा. नि बसा बरळंत."

  • पाकसिद्धी: एक मार्गदर्शन

    .,,.इरादे पाक (पवित्र ) असतील तर कृतीला समर्थन मिळणारच !


    पाकसिद्धी: एक मार्गदर्शन


    परवाच मित्राला म्हणालो की मी आमच्या संकेतस्थळावर पाककलेवर एक मार्गदर्शनपर लेख लिहिणार आहे. पाककलेपेक्षा 'पाकसिद्धी' हाच शब्द मला जास्त योग्य वाटतो. कला काय हो थोड्याशा प्रयत्नाने साध्य ही होईल पण सिद्धीसाठी तपश्चर्याच हवी !

    आवाज बंद - १

    पहाटे ९ वाजता मोबू किणकिणला. ब्लँकेटमधून हात बाहेर काढून मी तो घेऊन कानाशी लावला आणि कशीबशी 'ह्म' म्हणाले. पलिकडून आईचा आवाज,"उठलीस का?"
    "उंह्म"
    "अगं किती वाजले पाहिलंयंस का? ऑफीसला जायचं नाही का आज? ऊठ लवकर."
    "ह्म"
    "घसा ठीक झालेला दिसत नाही आहे अजून.."
    घाव वर्मी लागला..

    हिन्दी आरमाराचा उठाव - (1)

         [ माझे वडील कै. रघुनाथ भिडे १९४२ ते .. Air Force मध्ये होते. त्यांनी आत्मकथनपर 'गरुडांच्या सहवासात' नावाचे एक पुस्तक लिहिले होते. त्यातीला कांही भाग येथे उद्धृत केला आहे ] 


          सुट्टीवरून आल्यावर लक्षात आले, कँपमध्ये एक प्रकारची शिथिलता आली आहे.

    माझीच मला

    फारा वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो - आमचं लग्न नुकतंच झालं होतं, गोव्याचा आमचा हनीमून संपवून आम्ही पुण्याला परत आलो होतो. आमचं लग्न झालं त्या मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक - फडके - म्हणाले होते की लग्नाच्या प्रमाणपत्राचे काम ते करतील आणि काही दिवसांनी कार्यालयात आणून ठेवतील. ह्याच फडक्यांनी आमचं लग्न लागलं तेंव्हा मंजूळ संगीत वाजवायच्या ऐवजी लष्करी मार्चिंगचा बॅंड वाजवला होता. त्यावरून आजही लोक मला चिडवतात. तेंव्हा हे प्रमाणपत्राचं काम तरी नीट करतील ना हा माझ्या मनात प्रश्न होताच.