नाटाचे अभंग... भाग २९

२८.  बरवें झालें आजीवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं ।
 वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुम्हां समर्पण ॥१॥
 दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्या नाश ।
 कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावों परतें ॥धृ॥
 बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं झाली ओढाओढी ।
 नासली जागृती घडी । साच जोडी शेवटीं गोड घांस ॥३॥
 तुम्हां पावविली हाक । तेणें निरसला धाक ।
 तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥४॥
 रविच्या नावें निशीचा नाश । उदय होतांचि प्रकाश ।

गीताई चिंतनिका

गीताई - चिंतनिका

११ सप्टें हा विनोबांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्याच एका ग्रंथाबद्दल मला भावलेले काही लिहित आहे.

गीताई तर सर्वांना माहित आहेच. तसेच गीता-प्रवचनेही खूपच प्रसिद्ध आहेत.
त्याचबरोबर गीताई - चिंतनिका या ग्रंथाबाबतही वाचकांना माहिती व्हावी
म्हणून येथे ती माहिती देण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.

आजीची कलात्मक गोधडी

'गोधडी' शब्द उच्चारला की तो 'आजी' ह्या विशेषणाविना अधुरा वाटतो नाही का? प्रेमळ मायेची ऊबदार गोधडी ही आजीचीच! कोणे एकेकाळी(? ) नऊवारीतली अन पांढऱ्या केसांची बाई म्हणजे आजी हे समीकरण होतं आता हे इतिहासजमा झालंय. आजच्या पिढीला आज्या ह्या सलवार कमीजमधल्या किंवा फार झालं तर साडीतल्या! त्यामुळे आजीच्या गोधडी प्रश्नच नाही. गोधडी हा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर जुन्या कपड्यांना टाकून न देता त्याला कलात्मक नवीन रूप देऊन त्याचे 'रिसायकलिंग' (पुर्नरवापर) करणे. त्यापाठीमागे आर्थिक कारण जास्त असावीत किंवा वाया जाऊ न देणे हे तत्त्व असावे पर्यावरण पूरकतेपेक्षा.