२९. आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि ठायीं ठेविला जीव ।
सकळ लाभांचा हा ठाव । ऐसा वाव झाला चित्ताठायीं ॥१॥
भांडवल गांठीं तरि विश्वास । झालों तें झालों निश्चयें दास ।
न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचाचि ॥धृ॥
आहे तें निवेदिलें सर्व । माझा मोडियेला गर्व ।
अकाळीं काळ आघवें पर्व । झाला भरंवसा कृपें लाभाचा ॥३॥
वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचूनि जाणत ।
तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥४॥
करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा ।