प्रसिद्ध अभिनेता आमीर खानने, नर्मदा आंदोलकांना पाठींबा दर्शवणारे मत व्यक्त केल्यानंतर , त्याने माफी मागावी असा तगादा लावणाऱ्या भा. ज. प. समर्थकांनी बालीशपणाचा कळस गाठला आहे, असे माझे मत आहे.
त्याच्या चित्रपटावर बंदी घालणे म्हणजे, 'असं करतोस काय! थांब तुला दाखवतोच या पद्धतीची सरळ सरळ दडपशाही झाली.
आमीर हा काही गुन्हेगार नाही. भारत हा एक स्वतंत्र देश असून, लोकशाहीने प्रत्येक नागरीकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे, याचा भा. ज. प. ला विसर पडलेला दिसतो.
बॉलीवुडने आमीरला दिलेला एकमुखी पाठींबा या पार्श्वभूमीवर स्वागतार्हच म्हणायला हवा.