पुणेरी हिसका

१)  tttp://www.puneri_joshi.com/

     सूचनाः ही जोश्यांची वेबसाईट आहे.
     उपसूचनाः उगाच ईकडे तिकडे क्लिक करत बसू नये.


२)  सूचनाः दवाज्यामधे थांबून गप्पागोष्टी करू नये, ही जागा व्यवसायाची आहे  
     चर्चा करण्याचा हॉल नाही - व्यवस्थापक

गुरुनाथ आबाजी कुलकर्णी

मी प्रथमच सांगतो की मी फार वाचत नाही, पण मला गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, उर्फ़ GA यांची पुस्तके आवडतात.


यांची कुठली गोष्ट आपल्याला आवडते ते कृपया सांगावे, म्हणजे वाचायला बरे!!


मला ऑर्फियस आवडते, तुम्हाला??


 

माझी पहिली डेट....

नुकतंच वयात आलेलं ते चाफ्याचं झाड पुलाच्या अगदी सुरुवातीलाच आहे.कमरेत वाकल्याने कमानीप्रमाणे पुलाच्या दिशेने झुकलेलं.रस्त्यावर सांडलेली त्याची काही फुलं. 'आजकाल कुणी इकडे फिरकतच नाही' असं म्हणत जरासा खट्टू असलेला तो पूल.पुलाखाली इथून कधी पाणी वाहत होतं त्याच्या खूणा.पुलाच्या पलिकडे पेटलेली गुलमोहराच्या झाडाची रांग.रंग उडालेले पुलाचे कठडे.त्या कठड्यांवरती एकत्र जमलेल्या साळुंक्या....आणि एकाच वेळी दोन जीवांच्या आयुष्यात कायमची अविस्मरणीय ठरणार असलेली उन्हाळ्यातली एक शांत,गार संध्याकाळ.
आणि ती मला दुरूनच दिसते आहे! उन्हाळ्यातल्या typical संध्याकाळी पावसाची वर्दी देत जे तांबूस पिवळसर ढग आकाशात फिरत असतात ना - त्यांच्याकडे एकटक पाहत ती उभी आहे.मुद्दाम थोडा उशीर करायचा असं आधीच ठरवलं असल्याने मी अगदी वेळेत पोहोचलो आहे.चाफ्याच्या झाडाखाली गाडी लावून तिच्या दिशेने एक एक पाऊल टाकत आहे...संथपणे.

डायरी --- 'तिची' आणि 'त्याची'

मित्रांनो, असं म्हणतात की दुसऱ्याची डायरी कधी वाचु नये. पण ई-मेल मधुन मला 'त्या' दोघांच्या डायरीमधलं एक पान कुणीतरी पाठवलं आणि ते तुम्हालाही वाचुन दाखवण्याचा मोह मला आवरला नाही. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या जीवनातही हे पान कधीतरी फडफडलं असेल ना!