रेखाटन-२


 माझे आणखी एक रेखाटन ( माझे म्हणजे घोड्याचे नव्हे ;) )

तळटीपः
ह्या चित्रातील घोडा आणि घोडेस्वार दोघेही मराठी आहेत.

अंड्याची भजी

वाढणी
भुकेवर अवलंबुन

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • एक 'विब्स' ब्रेड,(किंवा कोणताही ,दुकानात असेल तो.)
  • सहा अंडी,
  • मिरी,
  • कोथिंबिर,
  • मिठ (गरजेपुरते)
  • बटर,

मार्गदर्शन

पुण्यातील गुन्हेगारी.

आज पुण्यातील गुन्हेगारी कशी वाढत चालली आहे याचे प्रत्यंतर मला आले.


मी लुल्लानगर या भागात राहतो. आज कचेरीतून लवकर आल्यावर मी बाइकव्ररुन फिरावयास बाहेर पडलो. मंत्र या मॊलवरुन भटकून, अलीकडून एन. आय. बी. एम. कडे जाणारा रस्ता आहे, तिकडे वळलो. रस्त्यावर काम चालू असल्याने बाइक हळू चालवावी लागत होती. तेवढ्यात पाठीमागून बाइकवरून दोन मुले येऊन त्यांनी माझा रस्ता अडवला. एक जण "मला शिव्या का देतोस" म्हणून अंगावर धावून आला. तर दुसयाने बाइकची चावी कडूनं घेतली. लोक जमा झाली आणि तेवढ्यात एक माणूस जवळ येऊन पोलिसात चला म्हणू लागला. मी माझ्या मोबाईल वरून पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करताच तिघे माझ्या हातातला मोबाईल ओढायचा प्रयत्न करू लागले. आणि ते तिघे मिळून मला एका रिक्षात बसवण्याचा प्रयत्न करू लागले. मदतीसाठी कोणी पुढे येतच नव्हते. मी एकटाच झुन्ज देत होतो. तेवढ्यात मला बाइकची चावी मिळवण्यात यश आले. आणि मी त्यांना जोरात दूर ढकलत जवळच एका सोसायटीत शिरलो. आणि १०० क्रमांक लावून पोलीसांना बोलवण्याचा प्रयत्न करू लागलो. परत एकदा ते माझ्या पाठीमागे धावून येत, मोबाईल आणि चावी ओढण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु त्यांना मी यश येऊ दिले नाही. आतापर्यंत बरीच लोक गोळा झाली होती. त्याचा फायदा घेऊन मी एका इमारतीत शिरलो.

उन्हाळे - पावसाळे पाहतात , मग हिवाळे का नाही ?

लोक, विशेषतः जुने लोक, स्वतःबद्दल बोलताना 'आम्ही इतके इतके उन्हाळे- पावसाळे पाहिले आहेत' असे म्हणतात. पण या वाक्प्रचारात उन्हाळ्या- पावसाळ्यांबरोबर हिवाळ्याचा समावेश का केला जात नाही ? उन्हाळा वा पावसाळा या ऋतूंमध्ये व हिवाळा या

तळलेले बटाट्याचे काप

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • मोठे बटाटे ३
  • लाल तिखट, मीरपूड, मीठ
  • तळ्ण्यासाठी तेल किंवा तूप

मार्गदर्शन
बटाटा कापांसाठी मोठे बटाटे जास्ती चांगले. पहिल्या प्रथम बटाटयाची साले काढून मोठे उभे काप करणे. मध्यम आकाराचे. नंतर तेलात खमंग तळावेत. लाल रंग येईपर्यंत. नंतर ताटलीत काढून त्यावर आवडीप्रमाणे लाल तिखट, मीरपूड व मीठ पेरून घोळवणे. गरम गरम खाणे. चहाबरोबर किंवा दही भाताबरोबर.

पटकन उत्तर द्या - २


समजा तुम्ही एका शर्यतीमध्ये धावत आहात. नेहमीप्रमाणे आठ स्पर्धक यात भाग घेत आहेत. अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला मागे टाकले तर तुमचा कितवा नंबर येईल? काय म्हणालात, पहिला? .. उत्तर चुकले. ... बरोबर उत्तर आहे...तुम्ही तिसऱ्या नंबरवरून दुसऱ्यावर गेलात. ..हा भाग जवळ जवळ दोनशे लोकांनी वाचलेलाच आहे. आता कृपया पुढचा भाग सुद्धा वाचावा. .........................

तोडलेले तारे

शैक्षणिक आयुष्यात, आणि आई शिक्षिका असल्याने परिक्षा आणि त्यात लिहीलेली/दिलेली उत्तरे यात बरेच गंमतीदार अनुभव आले. विशेषतः दहावीच्या परीक्षा आणि अभियांत्रिकीच्या तोंडी परिक्षांमधील उत्तरे. काही वानगीदाखल नमुने हे असेः
१. प्रश्न (तोंडी परीक्षा) - 'इंडक्शन मोटर' कशी चालू होते?
उत्तर. 'खटॅक!'(बटण चालू केल्याचा आवाज) 'डुर्रर्रर्र ऽऽऽऽ '
२. प्रश्न(दहावी पेपर)- आम्लराज म्हणजे काय?
उत्तरः आम्लराज आणि अल्कराज हे दोन भाऊ आहेत आणि दोघांचे आडनाव 'राज' आहे.
३. प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.

'गोल्डन वीक'

भारतातून निघण्यापूर्वीच मला येथील 'गोऽरुदेन वुइक्कु' (गोल्डन वीक) चे वेध लागले होते. जपानमधे एप्रिल अखेर व मे च्या पहिल्या आठवड्यात बऱ्याच सुट्या जोडून असल्याने त्याला 'गोल्डन वीक' असे म्हटले जाते. याची सुरुवात होते २९ एप्रिल 'मिदोरी नो हि' - हिरवाई दिवसापासून. मग ३ मे - 'केंपोकिनेनबी '- जपानची घटना कार्यान्वयित झाली तो दिवस, ४ मे - 'कोकुमिन नो क्योऽजित्सु' - दोन सुट्यांमधला दिवस. इथे कायद्याप्रमाणे २ सुट्यांमधल्या दिवशीही सुटी द्यावी लागते, ५ मे- 'कोइनोबोरी' - मुलग्यांचा सण आणि शनिवार -रविवार धरून सलग ५-६ दिवस सुटी मिळते. हा आठवडा म्हणजे रात्री उशीरापर्यंत काम करणाऱ्या लोकांसाठी मौजमजा करण्याची पर्वणीच असते.

सोजी हलवा

वाढणी
२-३

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • दूध-१/२ लिटऱ
  • साखर-१ वाटी
  • गव्हाचा जाडा रवा (सोजी)-पाऊण वाटी
  • काजू-पिस्त्याचे तुकडे
  • वेलची-जायफ़ळ पूड
  • २ चमचे तूप

मार्गदर्शन

तुपावर रवा किंचित भाजून वरून दूध घालावे.

शक्यतो न चिकटणाऱ्या भांड्यात करावे.

उकळी आल्यावर साखर घालावी.

किंचित पातळ असतानाच भांडे उतरवावे. आपोआप आटतो हलवा.

उतरवल्यावर काजू, वेलची घालावे.

 

टीपा

पौष्टिक खाऊ!