एका लग्नाअगोदरची गोष्ट

एका लग्नाअगोदरची गोष्ट!!


संदर्भः- मेकिंग ऑफ़ स्पेशालीस्ट


मी मागेच म्हटल्याप्रमाणे जसजशी हरकामेगिरी संपत येते तसतशी आमच्यामागील आईवडीलांची लग्नाची घाई वाढत जाते. आमचंही असंच झालं. किती वेळा सांगूनसुद्धा दोन्हीकडच्या आईबाबांनी लग्नाचा एवढा तगादा लावला, की शेवटी त्यांच्या म्हणण्याला आम्हाला मान तुकवावी लागली. पण आमच्या दुर्दैवाने आमच्या ज्युनियर बॅचची ऍडमिशन काही दिवस लांबली आणि लग्नासाठी आम्हाला फक्त सहा दिवस रजा मिळाली.एक लग्नाचा स्पेशल ड्रेस/साडी वगळता आमची लग्नखरेदीसुद्धा आईबाबांनीच केली.

पुणे-कोल्हापुर

"आ sss ले  पाक,  आ ले पा ss क, खारा दाणा, वडा पाsssव..वडा पाव" अशा आवाजांनी स्टेशनचा परिसर नुसता भरून गेला होता. त्यातच निर्देशीका आपल्या शक्य तितक्या कोमल आवाजात "कोल्हापुरला जाणारी गाडी ७२३९ प्लॅटफॉर्म नं. ३ ला लागली आहे" वगैरे घोषणा करत होती. तिची ती अखंड बडबड KBC मधला अमिताभ बच्चनच काय तो 'समय समाप्ती की घोषणा' करून बंद करू शकला असता.

तोंडली-भात

वाढणी
२ जण

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस

  • १ वाटी तांदुळ,१ वाटी उभी पातळ चिरलेली तोंडली
  • फ़ोडणी - १ १/२ टे‌. चमचा तेल,१/४ छोटा चमचा मोहरी,६/७ पाने कढीपत्ता
  • २ वाट्या पाणी,१/४ छोटा चमचा हळद,मीठ चवीप्रमाणे
  • २ चमचे गोडा मसाला

मार्गदर्शन

१.तांदुळ धुवून निथळावेत.

२. लहान कुकरात तेल तापल्यावर मोहरी,कढीपत्ता घालावा.मोहरी तडतडल्यावर त्यावर तोंडली घालून २ मिनिटे परतवावीत.

३.त्यावर तांदुळ,हळद व गोडा मसाला घालुन १ मिनिट परतवावेत.

कैरीची चटणी

वाढणी
४ लोकांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • ३ कैऱ्या
  • १ चमचा लाल तिखट
  • २ चमचा साखर
  • १/२ चमचा तेल
  • चवीपुरत मीठ

मार्गदर्शन

हा पदार्थ आम्ही शाळेत असताना ऑफ(?) तासाला करत असू.

कैऱ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.  त्याच्या बरीक फाडी काराव्यात.  त्यावर तेल, तिखट, मीठ आणि साखर टाकून हे सर्व एकत्र करावे.  मग मस्तपैकी गप्पा मारत खावे.

-सुलु

चुटपुटे

वाढणी
कितीही केले तरी कमीच पडतात

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • चैत्रातल्या हळदी-कुंकवाला मिळतात ते चणे
  • फोडणीचे साहित्य
  • तिखट, चवीपुरतं मीठ

मार्गदर्शन

चणे स्वच्छ धुवून घ्यावेत. कढईत थोडं जास्त तेल घेऊन फोडणी करावी(तिखट न घालता) आणि त्यात चणे टाकावेत. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ आणावी. नंतर चण्यांवर तिखट घालून परतावे. चुटपुट असा आवाज आल्यावर गॅस बंद करावा.

 

टीपा

ह्यावर लिंबू पिळले तरी चालते किंवा ओलं खोबरं घालून सुद्धा छान लागतात.

कैरीची आंबटगोड चटणी

वाढणी
५ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • तोतापुरी कच्ची कैरी-मध्यम आकाराची १
  • कैरीच्या पाव भाग गुळ- चिरलेला
  • लाल तिखट १ चमचा
  • जिरे १ चमचा
  • मीठ चविनुसार

मार्गदर्शन

कैरीची साल काढुन त्याच्या बारिक फोडी करुन, मिक्सरमधे थोडे मीठ टाकुन बारीक करुन घ्या. मग गुळ , तिखट, जिरे घालुन एकदम बारीक करा.

ही चटणी पोळी, ब्रेड बरोबरही खाता येते.

 

टीपा

कैरी तोतापुरी किंवा कमी आंबट असावी.

हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान

हृदयविकारः १५-मनोगतावरील आरोग्याख्यान


सम्यक जीवनशैली परिवर्तनाचे तपशील जाणून घेण्यापूर्वी इथे, मनोगतावरच, आरोग्यसाधनेचे अनेक उत्तम उपाय चर्चिणारे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांची यादी करून त्यांच्या उपयोगितेची चर्चा करावी हे ह्या लेखाचे प्रयोजन आहे.