हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन

हृदयविकारः १४-सम्यक जीवनशैली परिवर्तन


सम्यक जीवनशैली परिवर्तन म्हणजे काय? तर आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन यांची व्यवस्थित योजनापूर्वक आखणी करून त्यानुसार आरोग्यहितकर जीवन जगल्यास विकार/विकृती दूर होऊन निसर्गनियमित/प्राकृत स्वस्थ आयुष्य घडू लागते.

हृदयविकारः १३-पुनर्वसन

हृदयविकारः १३-हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार)


जरी माझी हृदयधमनी शस्त्रक्रिया होऊन माझ्यावरील हृदयाघाताचा धोका टळलेला होता तरी चढेल रक्तदाब (१३०/९० ते १४०/१००) आणि वाढलेली कोलेस्टेरॉल पातळी (१९२) यांचा सामना मला करायचा होता. आणि भविष्यात औषधविरहित, विना शस्त्रक्रियाहस्तक्षेप, आरोग्यपूर्ण आयुष्य मला जगण्याची इच्छा होती. म्हणून, प्रतिबंधक हृदयोपचाराबद्दल मनात विश्वास निर्माण झाल्यावर मी हृदयरुग्ण पुनर्वसन कार्यक्रम (हृदयपुकार) मध्ये सहभागी झालो. मला सांगण्यात आले की आहार, विहार, व्यायाम, प्राणायाम, शिथिलीकरण, तणाव व्यवस्थापन, मनोव्यवस्थापन या सर्वांचा यथोचित आधार घेऊन सर्वंकष जीवनशैली परिवर्तन घडवता येते. त्या व्रताचे कठोर पालन केल्यास तीन महिन्यांच्या 'हृदयपुकार' ने हे साध्य दृष्टीपथात येऊ शकते.

हॅरी पॉटर

हॅरी पॉटरची पुस्तक साखळी मला खुप आवडते.  पण मातृभातेत वाचायला काही औरच मजा असते.  मला कोणि सांगू शकेल का की मराठी भाषांतरीत पुस्तकं आहेत का?  आणि ती कुठे मिळू शकतील?


-सुलु

हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण

हृदयविकारः १२-हृदयधमनीरुंदीकरण


शल्यक्रियेचे दुःखः प्रथम पुरुषी, एकवचनी


हृदयधमनीरुंदीकरण शल्यक्रियेनंतर माझा एक मित्र मला भेटायला आला. त्याने विचारले की शल्यक्रियेदरम्यान दुःख होते का? त्यावर खालील चर्चा झाली. मला वाटते की त्यात चर्चिल्या गेलेली माहिती प्रातिनिधीक आहे. कुणालाही सारखीच उपयोगी/निरुपयोगी. पण गरजवंतास संदर्भसाधन व्हावे म्हणून इथे लिहून ठेवत आहे.

महालक्ष्मी मंदिर - छायाचित्रे

नुकताच कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात जाण्याचा योग आला. पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाबरोबरच प्राचीन आणि सुंदर शिल्पकलेचा नमुना म्हणून महालक्ष्मी मंदिराचे महत्त्व आहे. हे मंदिर बऱ्याच मोठ्या जागेत वसलेले असून मंदिराची वास्तूही मोठी आहे. सभामंडप, गाभारा, आतील प्रदक्षिणामार्ग आणि अनेक स्तंभ कोरीवकामाने नटलेले आहेत. मंदिराला बाहेरूनही प्रदक्षिणा करता येते. मंदिराच्या आत आणि बाहेर इतर अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत.

मंदिराविषयी अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळू शकेल.
श्रीकरवीरनिवासिनी.कॉम
कोल्हापूरवर्ल्ड.कॉम

सकाळच्या वेळी काढलेली काही छायाचित्रे.

चित्रांवर टिचकी मारली असता नव्या खिडकीत मोठी चित्रे दिसतील. (इंटरनेट एक्स्प्लोरर वापरत असाल तर, इंटरनेट एक्स्प्लोरर चित्र लहान करून दाखवतो, चित्र मोठे दिसण्यासाठी चित्रावर माऊसचे टोक नेताच चित्राच्या खालच्या उजवीकडील कोपऱ्यात असे चित्र दिसेल, त्यावर टिचकी मारा.)

कचोरी

वाढणी
९ कचोरी - ४-५ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
60

जिन्नस

  • मुग डाळ - १ कप
  • मैदा - १/२ कप
  • बेसन - ४ चमचे
  • सोडा, तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले ,हिंग- चवीनुसार
  • तेल - १/२ कप

मार्गदर्शन

१. मुग डाळ  २-३ तास पाण्यात भिजवावी

२. मैदयात पाणी, तेल मीठ आणि सोडा घालुन सैलसर मळावा

३. मुग डाळ पाणी घालुन वाटुन घ्यावी

४.तेलामध्ये थोडे हिंग घालुन त्यात वाटलेली डाळ घालावी आणि त्यात तिखट, मीठ, बडीशेप, काळी मिरि, आले घालावे

शून्य (गूढ कथा)

शून्य  (गूढ कथा)


( या कथेतील सर्व पात्रे व प्रसंग हे काल्पनिक असून प्रत्यक्षातील कुठल्याही व्यक्ती वा प्रसंगाशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. )


प्रेरणाबाईंनी गाडी पार्क केली आणि एकवार घडाळ्यावर नजर टाकली. ठरल्या वेळेत येणे झालेले पाहून त्या क्षणभर विसावल्या. कुणी बघत तर नाही ना याची खात्री करुन त्या इमारतीमध्ये शिरल्या.डॉ. सुधाकर देशपांडे म्हणजे एक नामवंत मानसोपचार तज्ञ. पाटी वाचून त्या आतमध्ये शिरल्या.

हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण

हृदयविकारः ११-हृदयधमनीरुंदीकरण


कुणा एका हृदयरुग्णास पडलेले प्रश्न आणि त्याने शोधलेली त्यांची उत्तरे
अर्थातच प्रथमपुरूषी, एकवचनी


मीः डॉक्टर मला तुम्ही हृदयधमनीआलेखन (angiography) करण्यासाठी पाठवत आहात, पण मला हे सांगा, की  ते माझे हृदयधमनीरुंदीकरण (angioplasty) तर करण्यासाठी मला भाग पाडणार नाहीत ना? (हा लोकांनी व्यक्त केलेल्या अनुभवावर आधारित भीतीचा व्यक्त परिणाम होता.)

जैसे ऋतुपतीचे द्वार! (२)

कालिदासाने स्त्रियांसाठी खास सकामाः हे विशेषण वापरलं आहे. वसंतात प्रेमभावना, कामभावना द्विगुणित होतात. (वसंते द्विगुणः कामः) हा काळ कालिदासाने चितारल्याप्रमाणे खरोखरंच प्रणयकाळ!


केवळ भारतातच नव्हे, तर साऱ्या उत्तर गोलार्धात वसंताचं प्रणयाशी नातं मानलं गेलं आहे. जपानी भाषेतला एक हायकू हेच सांगतो.