तोडलेले तारे

शैक्षणिक आयुष्यात, आणि आई शिक्षिका असल्याने परिक्षा आणि त्यात लिहीलेली/दिलेली उत्तरे यात बरेच गंमतीदार अनुभव आले. विशेषतः दहावीच्या परीक्षा आणि अभियांत्रिकीच्या तोंडी परिक्षांमधील उत्तरे. काही वानगीदाखल नमुने हे असेः
१. प्रश्न (तोंडी परीक्षा) - 'इंडक्शन मोटर' कशी चालू होते?
उत्तर. 'खटॅक!'(बटण चालू केल्याचा आवाज) 'डुर्रर्रर्र ऽऽऽऽ '
२. प्रश्न(दहावी पेपर)- आम्लराज म्हणजे काय?
उत्तरः आम्लराज आणि अल्कराज हे दोन भाऊ आहेत आणि दोघांचे आडनाव 'राज' आहे.
३. प्रश्नः (दहावी पेपर)- कारणे द्या; गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ त्याच्याशी गप्पा मारते, म्हणून.


तुम्हाला माहिती आहेत का हो आणखी काही ऐकलेले/स्वतः तोडलेले तारे?