पुण्यातील खाद्य-मंदिरे

महोदय,


मी एक पक्का खवैय्या पुणेकर आहे. पुण्यातील अनेक उपहार ग्रुहे त्यांच्या खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. मला आवडणारया काही उपहार ग्रुहांची यादी मी देत आहे.


आपणांस माहित असलेल्या इतर उपहार ग्रुहांची नावे; पत्ता आणि खाद्यपदार्थांसह द्यावी ही विनंती. तेवढीच पेट्पुजेची संधी मिळेल.

अद्ययावत आणि अद्यावत

प्रतिसादांपुढे अद्यावत हा शब्द दिसायला लागल्यापासून अनेक मनोगतींनी ह्या शब्दाच्या बिनचुकतेविषयी स्वारस्य दाखवले. त्या सर्वांच्या कळकळीला आणि मराठीविषयीच्या तळमळीला दाद द्यायला हवी. पुष्कळांनी ह्या शब्दाबद्दल विचारणा केली म्हणून हे लिहावेसे वाटले.

एकनाथांचे भारूड

एका सुईच्या अग्रावर तीन गावे वसली
दोन ओसाड रे एक वसेची ना


असे एकनाथांचे भारूड आपणास माहिती असेल.  त्याचे सर्व शब्द आणि अर्थ श्री. विनायक यांनी (इतर कोणी दिला तरी चालेल) द्यावा अशी इथे जाहीर विनंति करीत आहे.  मुख्य म्हणजे नुसता शब्दार्थ नको तर भावार्थ आणि त्यातल्या तत्वज्ञानाचे विवरण आणि विवेचन व्हावे अशी अपेक्षा आहे.

साबुदाणा आणि उपास

मी असे वाचले होते की साबुदाणा साधारण सातव्या-आठव्या शतकात भारतात आला. म्हणजे तो मूळचा भारतीय नाही .मग तो उपासाला कसा चालतो,की उपास ही कल्पना ७-८ व्या शतकानंतरची आहे?


कोणी माहिती देईल का?


अवधूत

यज्ञकुंड आणि समिधा

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील चार पर्वे ही सशस्त्र क्रांतिची आहेत. पहिले १८५७ चे स्वातंत्र्यसमर ज्याने चेतना निर्माण केली. दुसरे पर्व स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्याने साम्राज्याला हादरा दिला. तिसरे पर्व हिंदुस्थान स्माजवादी प्रजासत्ताक सेनेचे ज्याने सरकारला इशारा दिला की आता घटका भरत आली आहे. चौथे निर्णायक पर्व आजाद हिंद सेनेचे ज्यांनी साम्राज्यावर निर्णायक घाव घातला.