वाढणी
२ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ
30
जिन्नस
- २ बटाटे (ऊकडलेले) , १ गाजर (किसलेले), १ बीट (कीसलेले)
- २ मिरच्या (बारीक चिरलेल्या), १ वाटी मटार (वाफ़वलेले), १/२ वाटी ब्रेडचा चुरा
- आलं-लसुण (बारीक चिरलेले), मीठ, तिखट.
मार्गदर्शन
ऊकडलेला बटाटा, गाजर, बीट, मिरची, मिठ,तिखट, मटार, आलं लसुण आणि ब्रेडचा चुरा एका पातेल्यात एकत्र करुन मळून घ्यावे.
हव्या त्या आकाराचे कटलेट हातावर बनवून घेणे आणि फ़्राईंग पॅन मधे थोड्याश्या तेलावर दोन्हीबाजूने खमंग तळणे.