हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा

हृदयविकारः १०-प्रतिबंधक हृदयोपचारशाखा


कुणा एका हृदयरुग्णाची प्रथमपुरूषी एकवचनी कहाणी पुढे सुरूच ...


तपास करता असे समजले की हृदयोपचारासाठी ऍलोपॅथीत दोन शाखा आहेत. पारंपारिक शाखा 'अधिक्षेपक हृदयोपचारशाखा  (इन्व्हेझिव कार्डिओलॉजी)' म्हणून ओळखल्या जाते. वाढलेल्या रक्तदाबावर उपचाराची पारंपारिक पद्धत ह्या शाखेत पुढीलप्रमाणे आहे. १२०/८० पासून वाढत वाढत रक्तदाब १३०/९० च्या पुढे गेल्यावर ते रक्तदाबनियंत्रक गोळ्या देऊन त्याचे व्यवस्थापन करतात. १६०/१०० पेक्षा जास्त झाल्यावर रुग्णालयात दाखल करतात. मेदविदारक (कोलेस्टेरॉलनाशक) गोळ्या सुरू करतात. त्यांनीही रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास विद्युत हृदयालेखन, ताणचाचणी आणि हृदयधमनीआलेखन इत्यादी चाचण्या करवतात. त्यात हृदयधमनीत अडथळे निपजल्यास हृदयधमनी रुंदीकरण अथवा उल्लंघन शस्त्रक्रियेद्वारा ते रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

उर्दू-हिंदी शब्द-कोश हवाय...

मला एक उर्दू-हिंदी शब्द-कोश हवाय , ज्यामधे उर्दू शब्दांचे अर्थ हिंदी मधे दिले असतील, आणि मूळ उर्दू शब्द सुद्धा देवनागरी मधे लिहिलेला असेल, (म्हणजे ज्यांना उर्दू वाचता येत नाही त्यांनाही तो शब्द वाचता येईल). कोणाला असा शब्दकोश कुठे मिळेल हे माहिती असल्यास कृपया कळविणे, मी त्यांचा आभारी राहीन

लोकपरित्राण पार्टी

प्रथम पाच पांडव , नंतर "रंग दे बसंती" चे पाच युवक; आणि आता आय आय टी चे पाच तरुण .
 
चांगल्या करियरला लाथ मारुन देशाचे हाल सुधारायचा विडा त्यांनी उचललाय, आणि एक नव्या राजनैतिक पार्टीची त्यांनी स्थापना केलीय, जिचे नाव आहे - लोकपरित्राण पार्टी, ज्याचा अर्थ होतो वेगवेगळ्या संकटातून मोठ्या मुश्किलीने झालेली सुटका.

हृदयविकारः ९-पहिला दिवस

हृदयविकारः ९-


कुणा एका हृदयरुग्णाच्या हृदयधमनीरुंदीकरण शस्त्रक्रियेनंतरचा पहिला दिवस, प्रथम पुरूषी एक वचनी


ताणचाचणी सकारात्मक आली. ती हृदयधमनीतील अडथळ्यांकडे संकेत करीत असल्याचे सांगण्यात आले. हृदयधमनीआलेखन करून घेण्याचा सल्ला दिल्या गेला. ते केल्या गेले. डाव्या समोर उतरत्या हृदयधमनीत एकच अडथळा होता. ७० टक्के धमनीला व्यापून टाकणारा. तो त्याच शस्त्रक्रियेदरम्यान काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला. डॉक्टरांची ख्याती एवढी जबर होती की मला आणि नातेवाईकांना वेगळा विचार करण्याची आवश्यकताच वाटली नाही. त्यांचा सल्ला मानून तो अडथळा लगेच काढून टाकण्यात आला. तिथे कलंकहीन पोलादाचा १६ मिलीमीटर लांबीचा व २.२५ मिलीमीटर व्यासाचा, औषधवेष्टित विस्फारकही बसविण्यात आला. एका दिवसानंतर मला घरी सोडण्यात आले.

हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली

हृदयविकारः ८-योग-एक जीवनशैली


'योग-एक जीवनशैली' हे नाव आहे एका पुस्तकाचे ज्याचे लेखक आहेत डॉ. नंदकुमार गोळे. मात्र 'तो' मी नव्हेच. ते मात्र स्वतः डॉक्टर असण्यासोबत योगशिक्षकही आहेत. मी जेव्हा योगाची माहिती शोधत होतो, तेव्हा योगाबाबत शास्त्रीय माहिती असलेली अनेक पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दोन पुस्तके निकम गुरूजींच्या अंबिका योग कुटिर ची आणि दोन जनार्दनस्वामींच्या योगाभ्यासी मंडळाची होती. ही पुस्तके योगाभ्यासी गुरूकुलांची होती. मात्र मला, डॉक्टर असून योगशिक्षक झालेल्या गोळ्यांच्या पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण झाले. मी ते वाचले आणि मला जाणवले ते हे, की मला हवी तशी शास्त्रीय माहिती त्यात उत्तम रीतीने दिलेली आहे. आपणही ती अवश्य वाचा. योग आणि व्यायाम एकच नाहीत. योगात रक्तदाब कमी होतो तर तो व्यायामात वाढतो. ह्याचे सविस्तर निरुपण त्यांनी ह्या पुस्तकात केलेले आहे. अवश्य वाचावे.

ई-सकाळचे नवे स्वरूप

ई-सकाळचे रूप नुकतेच बदलेले आहे.  सध्या त्या संकेत स्थळावरची पाने उघडताना वेळ लागतो किंवा ते अडकूनच बसते.  तसेच मागील अंकांकरता पोहोचण्याची कळ लुप्त झाली आहे.


तुम्हाला कोणाला असे अनुभव आले आहेत का?  पुण्यातील मनोगतींना याबद्दल माहिती काढून काही मदत करता येईल का?

हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष

हृदयविकारः ७-स्वस्थतेचे निकष


हृदयविकार असतो तेव्हा आपण स्वस्थ नसतो. म्हणजे स्वस्थ असणे हे आपले इप्सित असायला हवे. मग आपल्याला स्वस्थता कशी मोजतात ते माहीत असायला हवे.


एकाला विचारले की तू पौष्टिक आहार घेतोस का? तर तो म्हणाला 'हो. नेहमीच'. मग त्याला विचारले की तुला पौष्टिक म्हणजे काय ते माहीत आहे का? तर त्याने उत्तर दिले 'नाही'. आपली अवस्था नेहमी बहुधा अशीच असते. म्हणूनच स्वस्थतेच्या निकषांचा हा प्रपंच.

हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव

हृदयविकारः ६-रक्तदाबाचे प्रभाव


निराश झालेल्यास हिंदीत अशी तसल्ली देतात की 'दिल छोटा न करो'. मात्र उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाच्या हृदयाचा आकारच त्या दाबाने वाढतो आणि तो रुग्ण 'दिल बडा' करून बसतो. पण ही स्थिती वस्तुतः निराशाजनक असते. कारण मोठे हृदय मोठ्या रक्तप्रवाहास आणि त्यानुषंगाने आलेल्या थकव्यास कारणीभूत ठरते. द्विमितीय प्रतिध्वनी चाचणीने (टू डी. इको टेस्टने) ह्याचा शोध घेतात.