आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -२

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


या आधी आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -१


हल्ली आपले वाढते दारिद्र्य व प्रवासाची साधने यामुळे सामायिक कुटुंबांची संस्था दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गाला लागली आहे. तथापि, हल्लीही जी अवशिष्ट अवाढव्य सामायिक कुटुंबे तुरळक तुरळक आपल्या दृष्टीस पडतात, त्यावरून त्यांच्या पूर्वीच्या स्थितीचीही आपणास कल्पना करिता येते. अनेक कुटुंबांत चार-चार, पाच-पाच पिढ्यांचे नातलग व त्यांचे आश्रित मिळून ५०-५०, १००-१०० माणसे असल्यास नवल नाही. या लहानशा राज्याची व्यवस्था पाहता पाहता कर्त्या पुरुषास कुटुंबाच्या बाहेर काय चालले आहे, हे पाहण्यास सवड किंवा उत्साह न उरल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कुटुंबातल्या कुटुंबात स्वरक्षणाची सर्व साधने अनुकूल असल्याने कुटुंबबाह्य गोष्टीकडे लक्ष्य पुरविण्याची त्यास आवश्यकताही भासत नसे. पंचायतीसारख्या ग्रामसंस्था असल्यामुळे इतर ग्रामस्थ कुटुंबांशी त्यांचा अगदीच संबंध येत नसे, असे नाही. पण एवढे खरे की, गावापेक्षा स्वकुटुंबाशीच अधिक संबंध पडत असल्यामुळे, ग्रामस्थितीपेक्षा  कुटुंबाच्या क्षेमाकडेच त्यांचे चित्त अगदी वेधले जाई. ही कुटुंबाच्या कर्त्याची गोष्ट झाली. इतर कुटुंबीय मनुष्यांचे केंद्र कर्ताच असल्यामुळे त्यांचा इतर ग्रामस्थांशी तात्पुरताच संबंध असे.

अधुरी एक कहाणी (एक सत्यकथा ) भाग २

अधुरी एक कहाणी
(एक सत्यकथा भाग २)


"गेल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी अन् माझे कुंटूबिंय आमच्या कोकणातल्या गावी चिपळूणला निघालो होतो. यंदा एस्. टी ला पर्याय म्हणून आम्ही कोकण रेल्वेने जायचं ठरविले, आणि पहाटेपहाटे दिवा स्थानकात पोहचलो. गाडीचे सर्व डबे सामान्य असल्यामुळे आम्ही लवकर जागा पकडण्यासाठी गाडीत चढलो. मी ज्या जागेवर बसले त्याच्या समोरच्या जागेवर शाम बसला होता, माझ्यासारखीच त्याने ही अख्खं बाक अडवलं होतं. थोड्यावेळाने जागेवरुन त्याची व आमची जुंपली पण लगेचच परिस्थिती निवळली. गाडीच्या गतीसोबत आमची बोलणीही वाढत गेली. आणि बोलता बोलता त्याने मला आपला मोबाईल क्रमांक दिला, आणि मुंबईत परत आल्यावर फोन कर असे म्हणाला.
         आम्ही चिपळूणवरुन परतून पुन्हा मुंबईत आलो. मनात थोडी हुरहुर होती पण मन घट्ट करुन मी फोन केला. फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आमचे भेटायचे ठरले. तो मला घाटकोपर येथे भेटायला येणार होता. मी बऱ्यापैकी उत्सुकतेने भेटावयास निघाले. आणि या पहिल्याच भेटीत आम्ही दोंघ एकमेकांच्या प्रेमात पडलो.
        ती बोलायची थांबली. तेव्हा मी मिशीतल्या मिशीत हसत होतो. मला हसताना पाहून ती भानावर आली असावी. थोड्याश्या गोंधळलेल्या स्वरात म्हणाली "हसताय का?" मी म्हणालो "हसू नाहीतर काय करु? पहिली भेट-फोन नंबर देणे - दुसरी भेट - प्रेम जाहीर" ही कथा थोडीशी फिल्मी वाटतेय वात्सवाच्या जवळपास जाणारी नाही म्हणून हसतोय. थोडसं न राहून आश्चर्य वाटलं ना.
       तिथुन पुढे प्रत्येक दिवसाचं धावतंवर्णन ती मला ऐकवायची, "आज आम्ही इकडे फ़िरलो.... आज आम्ही हे खाल्लं" सारं सारं काही सांगायाची. कदाचित माझ्यावर विश्वास असावा म्हणून इतर सहकाऱ्यांपेक्षा ती मला मनातलं सारं काही सांगायची. एकदा तर माझी आणि शामची भेट ही करुन दिली. शाम देखिल  दिसायला बऱ्यापैकी सुंदर, स्वभावाने चांगला होता. आणि सीमाची निवड योग्य असल्याची मला खात्री झाली. तेव्हा मी त्या दोघांना होईल तेवढे सहकार्य करण्याचे ठरविले. अधिक चौकशीअंती कळले की, सीमा व शामच्या विवाहाच्या वेळी जातीचा प्रश्न उभा राहिल. कारण सीमा तिलोरी कुणबी आणि शाम गाबित. दोन्हीही हिंदुच्याच पोटजाती पण आपल्या समाजात जातीला महत्त्व फार. कारण आपले वडीलधारे पुरोगामी विचारांचे त्यामुळे या विवाहास त्यांची संमती मिळेल की नाही ही शंका. तसं मी तिला बोलूनही दाखवलं पण म्हणतात ना प्रेमाला वय, जात, धर्म, रंगरुप नसते असाच काहीसा इथं अनुभव येत होता. तसं पाहिलं तर हे प्रेमयुगल मात्र बिनधास्त होते कारण पहिलंच प्रेम आणि समाजातल्या रुढींचा, पद्धतींचा, विचारांचा अनुभव कमी त्यामुळे सारं काही आलबेल होईल हा गोड गैरसमज.
      

अधुरी एक कहाणी (एक सत्यकथा)

अधुरी एक कहाणी
(एक सत्यकथा)


ही एक सत्यकथा आहे. ही कथा वाचल्यानंतर या कथेतील प्रेमयुगूलाला कृपया योग्य मार्गदर्शन करावे.


   गणेशोत्सव संपून आम्हाला आता नवरात्रौत्सवाचे वेध लागले होते. याच दिवसांत आमच्या ऑफ़ीसात एक नवीन महिला कर्मचारी कॅम्प्युटर ऑपरेटर या पदावर कामासाठी रुजू झाली. नाव सीमा (बदललेलं) वय वर्षे बावीस. दिसायला बऱ्यापैकी सुंदर, पण बोलण्यातल्या एका वेगळ्या खासीयतेमुळे लवकरच तिने सर्व सहकारी कर्मचाऱ्यांची मने जिंकली. तिचे डोळे मला बाजारात विक्रीस असलेल्या दुर्गेच्या मुखवट्यासारखे (दाक्षिणात्य नर्तकी ) वाटायचे म्हणून मी तिला 'दुर्गा' या टोपणनावाने  हाक मारायचो. पुढे 'पछाडलेला' या मराठी चित्रपटातील "एऽऽ डोळे बघ ... डोळे बघ..." या संवादामुळे आम्ही तिला दुर्गामावशी हे विशेषण चिकटवले. सीमा आम्हालाही वेगवेगळ्या नावाने संबोधायची. मला तर चक्क 'बटूवामन' म्हणायची. (माझी उंची कमी असल्यामुळे). अवघ्या महिन्याभरात ती आमच्यातली होवून गेली.
       थट्टामस्करीत दिवस उडून जात होते. आणि एके दिवशी गप्पा मारता मारता फोन खणखणला.
"सीमा आहे का ?" पलीकडून आवाज.
"आपण कोण?" माझा प्रश्न.
"मी तिचा मित्र बोलतोय." माझ्या बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या सीमाकडे मी फोन सरकवला. आणि त्यानंतर ती बराच वेळ बोलत होती. तिचं बोलणं संपल्यावर मी सहजच विचारले. "हा शाम कोण?"
"माझा मित्र" ती चाचपडत म्हणाली.
"मित्र की त्यापेक्षा काही वेगळं ?" मी अंधारात खडा मारला अन् काय आश्चर्य खडा अगदी निशाणावरच लागला. थोडेसे आढेवेढे घेत अखेर ती आपली प्रेमकहाणी सांगू लागली...................!!!

आमच्यातला राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव -१

श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या 'सध्यःस्थितिप्रेरित दोन नाटके' या टिकालेखातून घेतलेला उतारा काही भागांत देण्याचा विचार आहे.


आशियातल्या इतर देशांप्रमाणे हिंदुस्थानात पूर्वीपासून राष्ट्रीय सद्गुणांचा अभाव असलेला आपणास दिसून येतो. सर्व हिंदुस्थानात एक चक्रवर्ती असून त्याच्या प्रजाजनांमध्ये बंधुत्वाचे नाते आहे. असा काल आपणास इतिहासात बहुदा कधीच आढळून येत नाही. अनेक लहान लहान राज्ये भिन्न भिन्न राज्यांच्या अमलाखाली नांदत असून परस्परांमध्ये वैरे चालत असलेलीच आपल्या दृष्टोत्पत्तीस येतात. त्या वैरांचे पर्यवसान अनेकदा एक राज्य दुसऱ्यात लुप्त होण्यात होई. ती वैरे कधी कधी इतक्या तीव्रतेस पोहोचत असत की, मुसलमानांसारख्या परक्या शत्रूची धाड आली असतानाही त्या वैराचा या नवीन उपस्थित झालेल्या संकटांमुळे लय होण्याच्या ऐवजी त्यांचा फायदा शत्रूस घ्यावयास सापडे. ज्याप्रमाणे राज्यातील प्रजाजनांचा परस्परांवरील विश्वास नष्ट झाल्यावर त्याच्या परचक्राकडून ग्रास होण्यास विलंब लागत नाही, त्याप्रमाणे राष्ट्रसमुहाच्या भिन्न भिन्न अवयवांत दुजाभाव असल्यास त्यास अंकित करणे परदेशीय शत्रूस सोपे जाते. बरे, राज्याची अंतःस्थिती समाधानकारक होती असे म्हणावे तर तसेही दिसत नाही. राजाने प्रजेवर हवा तसा जुलूम करावा, व प्रजेने त्यास विष्णूचा अवतार मानीत तो निमूटपणे सहन करावा, त्यास दुसऱ्या राजाने जिंकल्यास त्याच्याशीही तितक्याच राजनिष्ठेने वागावे यापेक्षा अधिक समाधानकारक राजकीय परिस्थिती फारशी आढळून येत नाही. एखादे वेळी अशा प्रजेने राजास पदभ्रष्ट केल्याचाही दाखला इतिहासांत सापडतो, नाही असे नाही. पण अशा एखाद दुसऱ्या अपवादाचा उपयोग मुख्य नियम दृढतर करण्याचे कामीच विशेष होतो. अशा स्थितीत प्रजेत करारीपणाचे प्रमाण कमी असल्यास आश्चर्य वाटावयास नको.

समस्यापूर्ती (९)

ह्यावेळी वसंत हे वृत्त पाहू.


लगावली -
लगागागा लगागागा लगागागा लगागागा


गण -
लगागा गालगा गागाल गागागा लगागा गा
     ।       ।      ।     ।      । ग

एक महाग दंतकथा-३

 यापूर्वीः एक महाग दंतकथा-२ 
दाताच्या दुखण्यासाठी एक पेस्ट, साफ करण्यासाठी फ्ल्युओराईड पेस्ट,लवंग,वेदनाशामक गोळ्या असा सरंजाम घेऊन स्वारी आता भारतात कायम परतण्याची वाट पाहू लागली..

एक महाग दंतकथा-२

यापूर्वी वाचा  एक महाग दंतकथा-१
मला आता त्या दुखणाऱ्या दाताचे दुःख या किंमती ऐकून आपोआप कमी झाल्याचा भास होत होता. पण जर्मन सहकाऱ्यांनी आता माझ्या दाताचा प्रश्न धसास लावण्याचा चंग बांधला होता!! 

महाभारताविषयी मला पडलेले काही प्रश्न

लहानपणापासून मी अनेकदा महाभारत वाचले आहे - सचित्र ' अमर चित्र  कथा'
पासून संपूर्ण महाभारताच्या भाषांतरापर्यंत. (हे सर्व वाचन मराठी व
इंग्रजीत. संस्कृतचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे मूळ ग्रंथ वाचणे अशक्य
होते) . गेली अनेक वर्षे मला काही (कदाचित पाखंडी) प्रश्न पडले आहेत ते
खाली मांडतोय. यावर साधक-बाधक चर्चा आणि जाणकारांकडून मार्गदर्शन व्हावे
ही इच्छा आहे.

आपापली रेषा

१. माझ्या वर्गातल्या दोघीजणी तरूण मुलींच्या वक्षस्थळे शस्त्रक्रियेने वाढविण्याचा प्रवृतीवर टीका करीत होत्या.
आपली रेषा/मर्यादा आपणास मान्य होते पण आपल्या कल्पनेला न पचणारे घडले की आपण टीका करितो. पणजीच्या पिढीत साधी पाचवारी नेसली तर गहजब होत असे. आजीच्या पिढीत केस कापणे म्हणजे अक्षम्य गुन्हा होता. आई च्या मैत्रिणींना मेक अप करणाऱ्यांबद्दल बोलताना आठवते. तरीपण बायकोचे म्हणणे आहे शरीरावर दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करणे फारच झाले. कदाचित पुढची / अथवा त्या पुढची पिढी म्हणेल शस्त्रक्रिया ठीक आहे पण जेनेटीक्स क्लिनिक मध्ये जाऊन जीन्स चे म्युटेशन करून घेणे फारच झाले. काय चूक आणि काय बरोबर हे जागा / वेळ / पिढी म्हणजेच व्यक्तिसापेक्ष असते हेच खरे. आपणास काय वाटते?
२. परवा बाहेरच्या देशात बनविलेल्या कार घेण्याबद्दल दादा म्हणाला ही पिढी ऐषारामाच्या मागे लागली.
आजोबा म्हणे शहरात कायम पायी पायी जात असत. वडिलांनी सायकल घेतली तेंव्हा ती ऐषारामाचीच गोष्ट वाटली चुलत आजोबांना. नंतर त्यांनी मोटरसायकल घेतली तेंव्हा तर आजोबांनी जुने संदर्भ देणेच बंद केले. दादाची ईंडीका त्याला आवश्यक वाटते पण लोकांच्या इम्पोर्टेड गाड्या त्याला लक्झरी वाटतात. मी म्हणालो की आजोबांसारखा तूपण पायीत जात जा की ऑफिसला---चार मैल तर आहे. साहजिकच माझे म्हणणे आवडले नाही. "मॉरल हायग्राउंड" घेणाऱ्यांना माझ्यासारखे लोक फारसे आवडत नाहीत. ऐषाराम हा व्यक्ती सापेक्ष असतो हेही खरे. आपणास काय वाटते?
३. अत्यंत तापलेल्या आवाजात भारत आपला आहे असे तथाकथित हिंदुत्ववादी गृहस्थ २६ जानेवारीच्या पार्टीत दारू जास्त झाल्यावर "त्यांना म्हणा जा की पाकिस्तानात" असे म्हणत होते. मतितार्थ असा होता की १९४७ नंतर भारतात राहणाऱ्या मुसलमान लोकांचा भारत नाही.
त्यांना विचारले "भारत कोणाचा" ४७ नंतरचा म्हणाल तर तो त्यांचाही आहे. त्यामागे जायचे म्हणाल तर किती मागे जायचे हे कुणी ठरवायचे? १८०० पर्यंतच गेलात तर इंग्रजांचाही होतो, काही शतके आधी मोगलांचाही होतो. पुरातन काळापर्यंत जायचे म्हणता...मग तो द्रविडांचा होतो. आपण तर आर्यवंशीय असण्याबद्दल अभिमानी आहात. साहजिकच तसा नैतिक अधिकार असल्यासारखे बोलणाऱ्यांना दुसरी बाजू बघायला फ़ारसे आवडत नाही. आपणास काय वाटते?
४. आजची तरुणाई वाया गेली / पाश्चात्यांच्या नादी लागली असे "कांटा लगा"ची फीत बघितल्यावर मित्राच्या वडिलांनी घोषित केले.
प्रत्येक पिढीला आपल्या पुढची पिढी ही वाया गेलेली वाटते. दर पिढी तीच ओरड करते तर मग ते बदलत का नाही? लैंगिकता ही अस्पृश्य वाटावी अशी शिकवण. खजुराहो चे उदाहरण असूनही त्याबद्दल अभिमान नाही. याउलट लैंगिकता म्हणजे पाश्चात्यांची देणगी. कधीतरी आपण हे मान्य करू शकू का की लैंगिकता आणि तिचे काही प्रमाणात प्रदर्शन हे तरुणाईसाठी नैसर्गिक आहे. संस्कृतीदेखील काळ व व्यक्ती सापेक्ष असते का? आपणास काय वाटते?
मनकवडा