पैज ह्या प्रकारापासून मी जरा चार हात दूरच राहतो. कारण त्यात हरलो तर फार मोठे काही तरी गमवावे लागते आणि जिंकावे म्हणाले तर ते म्हणावे तितके सोपे नसते. पण शेवटी मानव प्राणी हा चुका करतच राहतो नाही का?
अशीच एक घटना, कॉलेजच्या दिवसांतील. नेहमीप्रमाणे आम्ही सगळे टवाळकीगीरी करत कॅन्टिन मध्ये बसलो होतो. रोज पैसे फार खर्च होतात म्हणून कॅन्टिन मध्ये जायचे नाही असे ठरवायचो.. आणि दररोज पावलं तिकडेच वळायची. सहज मनात विचार आला.. आठवडाभर रोज कॅन्टिनमध्ये येऊन खायचे आणि पैसे दुसऱ्या कुणी तरी भरायचे असे घडले तर किती बरे होईल नाई.
छायाने गेल्या आठवड्यात मनोगतावर एक वर्ष पूर्ण केले त्याबद्दल तिचे अभिनंदन! तिच्याकडून इथून पुढेही माहितीपूर्ण व विचारांना चालना देणाऱ्या लिखाणाची अपेक्षा आहे... पुढील वाटचालीस
एक निवेदन आहे... दोन दिवसापूर्वी कैरी ह्यांनी एक प्रश्न उपस्थीत केला होता की मनोगतीची ओळख कशी होणार ? दुवा
हाच प्रश्न मला देखिल पडला होता जेव्हा मी नवीन होतो मनोगतावर.. तसा हा प्रश्न कधी ना कधी सर्वांना पडलाच असेल ना... ह्या वर मला सापडलेला उपाय होता.. त्या त्या मनोगती ची व्यक्ती रेखा पाहणे. पण ह्या मध्ये ही एक अडचण आहे, सर्वच मनोगती आपली व्यक्ती-रेखा लिहतात असे नाही. जर का आपण सर्वानी आपली माहिती जी आपणास योग्य वाटते ती माहीती आपापल्या व्यक्ति-रेखे मध्ये लिहावी अशी विंनती आहे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.