सोनियाजींना शतकोटी प्रणाम

काल सोनिया देवींनी खासदारकीचा राजीनामा देऊन अजून एक मोठा त्याग करुन दाखवला आहे.


खरोखर सोनियाजी म्हणजे थोर आहेत. परमेश्वराने ही साध्वी बनवताना महात्मा गांधी, नेहरु, राजीवजी, संजयजी, इंदिराजी, गौतम बुद्ध, आंबेडकर, फुले, शिवाजी, शहाजी, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र, विवेकानंद, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, राणा प्रताप, अकबर, अरविंद, बाबा आमटे, अशोक, चंद्रगुप्त ह्या सर्व लोकांचे सर्व गुण तर घातलेच आहेत. शिवाय पदरचे आणखी अगणित गुण घातले आहेत. (वरच्या यादीत काही थोर व्यक्ती वगळल्या गेल्या असतील तर क्षमस्व)

मृत्यंजयाचा आत्मयज्ञ


आज दिनाक २३ मार्च. आज रोजी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांच्या दैदिप्यमान हौतात्म्याला ७५ वर्षे होत आहेत. या महान विभूतींना प्रणाम.


सरदार भगतसिंह उर्फ रणजीत हे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव याचे प्रतिक व क्रांतियज्ञाचे अध्वर्यु होते. सुखदेव उर्फ विलेजर हे तत्वज्ञानी व लाहोर कटामागची प्रेरणा व जणु एच एस आर ए चा मेंदू होते तर राजगुरू उर्फ रघुनाथ उर्फ एम हे देशासाठी बलिदान करायला उताविळ झालेले एक शिपा‌इ होते.

सोनुचे अजब जग

नदिच्या  काठावर तायडिच्या बाजुला नुसतं बसुन बसुन सोनु अगदी कन्टाळुन गेली होती.तायडी तर मस्त पुस्तक वाचनात मग्न होवुन गेली होती .तसा एकदोनदा सोनुने तायडिच्या पुस्तकात डोकावायचा प्रयत्न केला पण चित्रे नसलेलि पुस्तके वाचण्यात काय मजा? बसल्या बसल्या फ़ुले गोळा करुन हार गुम्फ़ुया असे तिने ठरविले.  भर दुपारी एवढे कष्ट घ्यावेत का असा विचार करतानाच लाललाल डोळ्यांचे एक गोरेपान ससोबा तिला दिसले.

हरिपाठ... श्री.ज्ञानदेवांचा! ( अभंग#२६)

                     ॥  श्री‌सद्गुरुनाथाय नमः ॥    

अभंग # २६.


एकतत्त्व नाम दृढ धरी मना । हरिसी करुणा येईल तुझी ॥
तें नाम सोपें रे रामकृष्ण गोविंद । वाचेसी सद्गद जपे आधी ॥
नामापरतें तत्त्व नाही रे अन्यथा । वाया आणिक पंथा जाशी झणीं ॥
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी । धरोनी श्रीहरी जपे सदा ॥

कैरीचा तक्कू

वाढणी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ कैऱ्या
  • अर्धा चमचा मेथीचे दाणे तळून त्याची पूड
  • आवडीप्रमाणे गुळ किसून
  • तिखट
  • मीठ
  • फ़ोडणीचे साहित्य

मार्गदर्शन
साल काढून कैरी किसावी.
त्यात मीठ, गूळ, तिखट, मेथीच्या दाण्यांची पूड हे सगळे घालावे. नेहमीसारखी फोडणी करून थंड झाली की तक्कूवर ओतावी.

टीपा
दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास तक्कू मुरल्यामुळे सुंदर चव येते.

माहितीचा स्रोत
आजी