आज हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांच्या तेजस्वी बलिदानास ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे ते अखेरपर्यंत 'आजाद' राहीले, अनेक वर्षे जंग जंग पछाडूनही इंग्रज सरकार त्यांना पकडु शकले नाही.
एकदा भूमिगत क्रांतिकारक आग्रा येथील मुक्कामी असताना उघड्याबंब बसलेल्या आजादांकडे पहात भगतसिंह हसत म्हणाले की पंडितजी, तुम्हाला फ़ाशी द्यायचे तर इंग्रजाना दोन दोर आणावे लागतील, एक गळ्यात आणि एक पोटाभोवती. त्यावर एकदम उसळत आजादांनी आपले कमरेला डावीकडे खोचलेले मॉवजर उजव्या हातात घेतले आणि ते म्हणाले, देखो रणजीत (भगतसिंहांचे एच.एस.आर.ए. मधील सांकेतिक नाव) ये रस्सा फ़स्सा तुम्हे मुबारक हो, मुझे फ़ासी जानेका कोइ शौक नही. जब तक यह बमतुल बुखारा मेरे पास है, कोइ माई का लाल अपनी मा का दूध नही पिया जो हमे जिवीत पकड ले जाये.