देवी, ऊठ पाहू. नऊ वाजलेत आता कौतुक पुरे झाले. आता जरा आवर आणि ते पाकीट उघड. आज दहा दिवस होऊन गेले, तुझी नाटक आणि तालमी आणि समारंभ यात तू आत्यानं लंडनहून एवढे अर्ज नी माहितीपत्रके पाठवली आहेत ती पाहिली सुद्धा नाहीसा. लोकांची मूल बिचारी परदेशी शिक्षणाची दूरून स्वप्न पाहतात, इथे सगळे हात जोडून हजर आहे तर बघायला वेळ नाहीये. आता काय बोलणार? वासंतीताईंच्या तोंडाचा पट्टा चालू होता. देवीने फक्त कूस बदलली आणि ती स्वतःशीच हसत पुन्हा आपल्या विश्वात गेली. तिची रात्र अजून संपली नव्हती.
हेमंतराव झोपेतून उठतात, अजूनही कालच्या दारू पार्टीचे परिणाम जाणवत आहेत. सुजलेले डोळे, जड डोके आणि पत्नीकडून अपेक्षित दमाची भीती या सर्व गोष्टींचे मिश्र प्रभाव त्यांच्या मुद्रेवर स्पष्ट दिसत आहेत.
सुट्टीचा दिवस. सहज गप्पा मारायला म्हणून मी शेजारच्या लाँड्रीवाल्या काकूंकडे गेले होते. त्यांची परवानगी घेऊन इस्त्री करायचं काम त्या दिवसापुरतं मागून घेतलं आणि त्या काकूंशी गप्पा मारत आणि रेडीओ ऐकत ऐकत करत होते. तेवढ्यात "ताई, आधी माझ्या गणवेषाला इस्त्री करून दे.
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.