प्रत्येक सुशिक्षित म्हणवणाऱ्या मराठी माणसाने आवर्जून वाचावासा. मुख्य म्हणजे साधू फ़क्त सद्यःस्थिती वर टिपण्णी करून मोकळे झालेले नाहीत. तर त्यांनी काही उपाय देखील सुचवले आहेत.
अर्जुनाची व्यक्तिरेखा आपल्या समोर रेखाटताना शिवाजी सावंतांनी कृष्णाच्या स्वभावाचे अनेक पैलू आपल्या समोर उलघडले आहेत. श्रीकृष्णाचे जीवन समजणे किती अवघड आहे व त्याचा आवाका किती मोठा आहे ते स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो, "श्रीकृष्णावर विचार करू लागलो की घटनांचे मृगतांडे मनात धपाधप उड्या घेत अनावर गतीने धावू लागतात. अनेकविध आकारांच्या रंगवैभवी मयूरपक्षांचे थवेच थवे मनाच्या किनाऱ्यावर केकारव करीत अलगद उतरू लागतात. त्यातील कुठल्याही एकावर म्हणून दृष्टी जखडून ठेवता येत नाही. मला आठवेल तशी ही कृष्णार्जुनगाथा मी सांगतो आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की त्याच जीवन म्हणजे मला गांडीव धनुष्याबरोबर मिळालेल्या अक्षय्य भात्यासारखे आहे."
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.