काही वर्षांपूर्वी 'लोकसत्ता' मध्ये सत्यशीला सामंत नामक विदुषीने जुन्या व शासन-पुरस्कृत नवीन शुद्धलेखन नियमांवर दोन दीर्घ लेख लिहीले होते. ते नेटवर कुठे उपलब्ध आहेत का? दुवा ठाऊक असल्यास कळवावे.
परंतु या site वरील लेख, विचार वाचताना एक गोष्ट मात्र जाणवली, ती म्हणजे काही ठिकाणचं अशुद्ध मराठी. (हे माझं लिखाणही त्याला अपवाद आहे असं मी म्हणत नाही). पण केवळ र्हस्व दीर्घाबाबत मी बोलत नाहीये. तर टंकलेखनातील चुकांबद्दलही काही लेखांमध्ये थोडा निष्काळजीपणा दिसत आहे. उदा. n वापरुन 'न' हे अक्षर तयार होत आहे, पण 'ण' लिहिण्यासाठी मात्र N लिहिणे आवश्यक आहे. तेवढी ही काळजी काही लोक घेत नाहीयेत.
मृदुलाताईंनी मला वैयक्तिक निरोपाने एक प्रश्न विचारला होता. आंतर्देशीय म्हणजे देशान्तर्गत का दोन (किंवा) अधिक देशामधला असा तो प्रश्न होता. मला वाटले की जाणकार मनोगती याचा उकल चांगला करतील. सध्या माझा मेंदू एव्हढा कार्यक्षम नाही.
'सूर्य उगवलाच नाही तर' ह्या विषयावर आपण एकदा तरी निबंध लिहिला असेल. प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना 'सूर्य उगवला नाही तर दिवस उजाडणार नाही, म्हणजे आई सकाळी लवकर उठवणार नाही, जास्त वेळ झोपता येईल आणि शाळेत जावे लागणार नाही' असा आनंद असतो. माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना शास्त्र विषयांमधून सूर्याच्या अस्तित्वावर पृथ्वीचे अस्तित्व कसे अवलंबून आहे आणि म्हणून असलेले सूर्याचे अनन्यसाधारण महत्व अशी माहिती मिळालेली असते. आजची सजीवांस जगण्यास योग्य असलेली परिस्थिती पृथ्वीवर निर्माण करण्यामधे चंद्राचाही वाटा असला तरी 'चंद्र नसता तर' असा निबंध मात्र कधी लिहायची वेळ शालेय जीवनात येत नाही. चंद्राचे वाङमयातील स्थान बरेचसे 'सुंदर-तरतरीत- गोर्या' चेहर्याच्या विशेषणापुरतेच मर्यादित राहिले आहे. चन्द्राच्या निर्मितीपासून (ज्या संदर्भात अनेक संकल्पना (thiories) अस्तित्वात आहेत) पृथ्वीच्या हवामानामधील दीर्घकालीन बदलांसाठी (सूर्याएवढा नसला तरी) चंद्रही जबाबदार आहे.
मनोगत वाढत आहे आणि वाढीमुळे होणाऱ्या अनेक अपरिहार्य गोष्टी इथेही घडू लागल्या आहेत. लेखनाचा दर्जा - निव्वळ जास्त मिसळीमुळे घसरू लागला आहे. सभासदांची संख्या वाढत आहे हे उत्तमच आहे, परंतु वाढलेल्या लेखसंख्येमुळे उत्तम, चांगले आणि फारसे चांगले नसलेले असे लेखन ओळखण्यास जास्त श्रम पडू लागले आहेत.
ह्यावर एक उपाय आहे तो लेखांना 'दर्जा देण्याची सोय' (rating) आणि 'लेखांवर दर्जानुसार अथवा लोकप्रियतेनुसार चाळणी लावण्याची सोय' (filtering according to rating or popularity).
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.