बेक्ड चिकन

वाढणी
४ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
45

जिन्नस

  • मेयॉनीज़
  • पावाचा चुरा
  • ६-८ कोंबडीचे तुकडे
  • हवे असल्यास बदामाचे पातळ काप आणि किसलेले चीज़
  • लसूण पाकळ्या २
  • चवीला मीठ

मार्गदर्शन

हे चिकन करायला अत्यंत सोपे आहे.  चांगली भट्टी(ओव्हन) हवी.

मेयॉनीज़

वाढणी
२५० ग्रॅम

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ अंड्यांचा पिवळा बलक,
  • दीड कप तेल
  • ४ चमचे लिंबाचा रस
  • चवीला मीठ

मार्गदर्शन

२ अंड्यांचा पिवळा बलक काढून एकामोठ्या रुंद तोंडाच्या भांड्यात घ्या.  त्यात मीठ घालून ते ढवळायला लागा.  फार वेगाने न ढवळता पण व्यवस्थित जोराने (शक्यतो काट्याने) ढवळा.  नंतर अर्धा चमचा रस घाला.  त्यात थोडे थोडे तेलाचे थंब-थेंब घालत ढवळत रहा.

पपई अननसाची भाजी

वाढणी
चौघांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • पिकलेले अननस २५० ग्रॅम
  • पिकलेली पपई २५० ग्रॅम
  • हिरवी सिमला मिर्ची २५० ग्रॅम
  • तूप दोन चमचे
  • मिरे
  • हिरवी मिर्ची ५० ग्रॅम

मार्गदर्शन

अननस व पपईची साल काढून अननस, पपई व सिमला मिर्चीचे लांबसर तुकडे (ज्युलिएन) करून घ्यावेत (साधारण अर्धा इंच बाय दोन इंच). हिरवी मिर्चीसुद्धा बारीक लांबसर चिरून घ्यावी. काळे मिरे कुटून (पण पावडर नको) घ्यावेत.

कांद्याचे सँडविच

वाढणी
एका भुकेल्या साठी

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • पावाचे स्लाईस ४
  • बटर
  • मायोनेझ
  • कांदा १ मध्यम
  • काळीमिरी पावडर दोन चिमुट
  • मीठ चवीनुसार.

मार्गदर्शन

चारही स्लाईसना दोन्ही बाजूंनी बटर लावून घ्या.

कांदा उभा आणि पातळ चिरून कुस्करून ठेवा.

मध्यम आंचेवर नॉन-स्टीक पॅन ठेवून त्यावर दोन स्लाईस ठेवा. स्लाईस दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर चरचरीत भाजून घ्या. भाजून झाल्यावर खाली काढून ठेवा.

मराठी पॅलिनड्रोम (Palindrome)

पॅलिनड्रोम (Palindrome) म्हणजे सरळ आणि उलट वाचले तरी सारखीच असणारी वाक्ये. उदाहरणार्थ, Nurses Run


मराठी मध्ये देखिल अशी वाक्ये भरपूर असावीत. लहानपणी ऐकलेली ही दोन वाक्ये


१. रामाला भाला मारा


२. ती होडी जाडी होती.


आणखी काही उदाहरणे?

नाथ कोडे

ज्येष्ठ लेखक डॉ. मधुकर वाकोडे ह्यांनी सांगितलेले हे गीतरूपी कोडे आहे.


मै मर गया तेरे लिये
तू ना मरना मेरे लिये
जो तू मर गयी मेरे लिये
वो उपर खडा तेरे लिये


गीत सोपे असले तरी खाली मराठी भाषांतर दिले आहे (नाही तर निरोप काढून टाकण्याची भिती आहे) -

व्हेज बिर्याणी

वाढणी
७-८ जणांना भरपेट

पाककृतीला लागणारा वेळ
120

जिन्नस

गणितातील मौजा

ज्ञानं च लोके यदि अस्ति किंचित् ।
संख्यागतं तच्च महान् महात्मन् ।
--- महाभारत

हे महात्म्या, जगात जर काही ज्ञान असेल तर त्यातील बरेचसे आकड्यांनीच भरलेले आहे.


ज्ञानप्राप्तीसाठी गणित शिकायला पाहिजे हे सर्वच मान्य करतात पण तरीही गणित हा विषय रुक्ष आहे अशी खूप लोकांची समजूत असते.

द्विमितीतील सव्यापसव्य

मागच्या भागात आपण टॉपॉलॉजी ह्या गणिताच्या शाखेची तोंडओळख करून घेतली. आज ह्याच शाखेतील आणखी काही माहिती मिळवायचा प्रयत्न करु.

ह्या लेखमालेतल्या पहिल्या भागाच्या प्रतिसादात कोणी तरी "हा लेख वाचताना कागद पेन्सिल घेऊन बसायला हवं!" असं काहीसं लिहिलेलं  आहे. आज मी जे लिहीत आहे ते वाचताना कागद-पेन्सिल इतकंच नव्हे तर कात्री आणि डिंकाची बाटली/चिकट कांडी घेऊन बसावे लागेल. आपण सर्वांनी लहानपणी कागदाचं घडीकाम, कातरकाम केलेलं आहेच. आज आपण तसंच थोडं करूया.

कोड्यांचे गुपित (परिशिष्ट)

 


'कोड्यांचे गुपित' मध्ये मी एखादी आकृती युनिकर्सल आहे की नाही ते ठरवण्यासाठी ३ चाचण्या सांगितल्या होत्या. त्याबद्दल थोडी कारणमीमांसा.


युनिकर्सलचा अर्थ लेखात आलाच आहे. त्यावरून लक्षात येईल की आकृतीतील प्रत्येक बिंदू(vertex)शी आपण एका मार्गाने आलो आणि तिथून बाहेर जायला दुसरा मार्ग उपलब्ध असेल तर कोणत्याही मार्गाची पुनरावृत्ती करावी लागणार नाही. म्हणजेच प्रत्येक बिंदूशी सम रेषा येऊन मिळाल्या असतील तर ती आकृती युनिकर्सल असेल. (चाचणी १)