ले व ल्या

खालील वाक्ये वाचा-


१. ...असे हल्ली विचारले जाते.
   ... असे विचारल्या जाते.


२. माझ्याकडून असे म्हटले गेले.
    माझ्याकडून असे म्हटल्या गेले.


३. अमाप पीक घेतले गेले.
    अमाप पीक घेतल्या गेले.


४. अनेकदा असे केले जाते.
   अनेकदा असे केल्या जाते.


ह्यातील योग्य वाक्ये कोणती? भाषाशिक्षित व्यक्तींकडूनही वरील दोन्ही प्रकारची वाक्यरचना ऐकायला/वाचायला मिळते. मला स्वत:ला प्रत्येक उदाहरणातील पहिले वाक्य योग्य वाटते. दुसरे वाक्यही योग्य आहे का?