देवांची भाषा-संस्कृत भाषा.
समाजमन काहीसे जड, निर्जीव, संमोहित होणारे असते. अनेक वेळेस आपण ऐकतो कि, संस्कृत भाषा ही मृत भाषा होत आहे, कधी ऐकतो कि, सध्या या भाषेसंबधी काहीच घडत नाही, आपल्याला वाटते,नव्हे पटते कि संस्कृत नष्ट झालेली भाषा आहे. याही पलीकडे कधी कधी असे ऐकतो कि, परकीय विशेषता जर्मन लोकं या भाषेच्या प्रेमात पडले आहे आणि त्याचा जास्तीत जास्त सखोल अभ्यास करत आहेत. मन मोहरुन जाते, तसा मला संस्कृत भाषेचा जराही गंध नाही, काही संस्कार नाही, पण मन आनंदीत होते हे मात्र खरे.
असाच मी माझ्या मित्रांमध्ये या विषयावर ( मृत भाषा म्हणुन) बोलत होतो, तेंव्हा मला माझ्या मित्राने सांगीतले कि, आजही संस्कृत वर बरेच लिहले जाते, बरीच वाड्मयीन निर्मीती होत असते, पण त्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार होत नाही. समाजाचे एक असते, त्यांना जे काही सांगीतले जाते, त्यावर काहीही विचार न करता ते ग्राह्य धरले जाते, तेच एक अंतिम सत्य आहे असे मानले जाते. याला एकच उपाय आहे, खरे आहे ते त्याला सांगीतले पाहिजे, खर्याचा पुरस्कार केला पाहिजे. असे केले म्हणजे समाजाची मरगळ दुर होते. समाज परत नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कार्यरत होतो.
याच विचाराने, मी आजच्या काळात संस्कृत भाषेच्या संदर्भात जे जे घडत आहे, त्याची माहिती देण्याचा प्रयत्न करत जाईल.
इतरानींही या ज्ञानयज्ञात सहभागी व्हावे, आज प्रसिध्द होणारी प्रकाशने, मासिके, संस्था, नवीन प्रकल्प आणि त्यांना असलेली माहिती इतरांना सांगावी ही कळकळीची विनंती.
माझा यात एक स्वार्थी हेतुही आहे, संस्कृतचे पुनर्जीवन मराठी भाषेला नव्हे, इतरही प्रादेशिक भाषांना नवसंजीवन देईल याची मला खात्री आहे.