वाढणी
चौघांसाठी.
पाककृतीला लागणारा वेळ
30
जिन्नस
- भेंडी अर्धा किलो.
- लाल तिखट १ टी स्पून
- हळद अर्धा टी स्पून
- जिरे १ टी स्पून
- ताक २ वाट्या
- मीठ चवी पुरते
- कोथिंबीर २ टेबल स्पून
- तेल पाव वाटी.
मार्गदर्शन
कधीही भेंडी घेताना, कोवळी, हिरवीगार, मध्यम आकाराची पाहून घ्यावीत. भेंडीचे टोक (देठाकडचे नाही, विरूद्ध बाजूचे), भेंडी मुठीत धरल्यावर, अंगठ्याने चट्कन मोडले पाहीजे.