सकाळ झाली. भैरु उठला. भैरुने 'हवा मे उडता जाये' असा दावा करणार्या रबरी सपाता पायात सरकावल्या आणि तो दंतधावन करण्यासाठी न्हाणीघरात गेला.
'दातों के कानेकोपरेतक पोहचणारी' एक विचारपूर्वक वेड्यावाकड्या बनवलेल्या दात्यांची दंतघासणी त्याने उचलली. त्यावर 'आत्मविश्वास' जागवणार्या दंतरसायनाचे नळकांडे दाबले आणि दात घासायला सुरुवात केली. दात घासून झाल्यावर जाहिरातसंतांनी सांगितल्याप्रमाणे दातावर बोट घासून 'च्युक' आवाज येतो का त्याची तपासणी केली. अरेच्च्या! आवाज नीट नाही आला. भैरुने परत थोडे दंतरसायन घासणीवर घेतले आणि परत दात घासले. यावेळी दातावर बोट घासल्यावर हवा तसा 'च्युक' आवाज आला. हुश्श!!