या देवी सर्व भुतेषु 'राष्ट्र'रूपेण संस्थिता,
नमस्तत्स्यै, नमस्तत्स्यै, नमस्तत्स्यै नमो नमः
निर्मळता हा मावशींचा सदगुण होता. घराप्रमाणेच मनालाही इतके स्वच्छ आणि मंगल ठेवण्याचे त्यांनी परोपरीने जपले होते. कुठलेही काम कितीही लहान अथवा कितीही महान असो ते तेवढ्याच तत्परतेने आणि शिस्तीने करण्यामागे त्यांचा कटाक्ष असे. तपस्वीता, कार्यप्रवणता आणि संवेदना यामूळे त्या जनसामान्याच्या मातृस्थानी पोहोचल्या, मावशी झाल्या.