श्रीखंड प्रकार १

वाढणी
दोन/तीन जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • केफ़िर चीज (लेबनी) नावाचे दही १ डबा
  • वेलची जायफ़ळ पूड पाव चमचा
  • बदाम काजु पिस्ते काप ५ चमचे
  • केशर चिमुट्भर
  • साखर १:१ प्रमाण

मार्गदर्शन

केफ़ीर चीज (लेबनी) दह्यामधे १:१ याप्रमाणे साखर घालून चमच्याने ढवळणे. त्यामधे बदाम काजु पिस्ते काप, वेलची जायफ़ळ पूड, केशर घालून परत ढवळ्णे.  झाले श्रीखंड तयार.

दह्याला रात्री बांधुन ठेवायची गरज नाही.  केफ़ीर चीज लेबनी या दह्यामधे अजीबात पाणी नसते.

मसाला चहा.

वाढणी
दोघांसाठी.

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ चमचे चहाची भूकटी. (शक्यतो, ब्रुक बाँड रेड लेबल)
  • ४ चमचे साखर.
  • एक कप दूध.
  • एक कप पाणी.
  • एक इंच आलं.
  • पाव चमचा वेलचीची भूकटी.
  • एक इंच दालचीनी.
  • ८-१० दाणे बडीशोप.

मार्गदर्शन
वरील सर्व जीन्नस एकत्र करून गॅसवर उकळवावे. चांगले  उकळल्यावर गॅस बंद करून पातेले २-३ मिनीटे झाकून ठेवावे. नंतर दोन कपांमध्ये गाळून घ्यावे. 

टीपा

टोमॅटोचे घट्ट पिठले

वाढणी
१ व्यक्ति

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • २ टोमॅटो
  • तेल, मोहरी, हळद, मीठ
  • तिखट/कांदा लसुण मसाला (KLM)
  • हरभरा डाळीचे पीठ

मार्गदर्शन

टोमॅटो बारिक वा मध्यम आकारात कापुन घ्यावा एका खोलग़ट भांड्यात. त्यावर पिठल्याला हव्या असलेल्या चवीचे मीठ पसरावे आणि थोडावेळ झाकुन ठेवावे (टोमॅटोला चांगले पाणी सुटे पर्यंत.)

कुड्या

वाढणी
२ जणांना

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • लसूण पाकळ्या १० ते १२
  • हिरव्या मिरच्या ४ ते ५
  • ख़ोवलेला ओला नारळ २ ते ३ वाट्या
  • तेल मोहोरी,हिंग,हळद,मीठ ,साखर

मार्गदर्शन

कढाईत थोडेसे तेल घालुन त्यात मोहोरी,हिंग, हळद टाकुन फ़ोड्णी करणे, त्यात मिरर्च्यांचे तुकडे,लसुण पाकळ्या टाकुन थोडे परतणे. नंतर त्यात ख़ोवलेले ओले खोबरे घालुन परत थोडे परतणे. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणी साखर घालणे.   gas बंद करणे.  लसुण पाकळ्या आणी मिरच्या जास्त शिजवायच्या नाहीत.

बटाटेवडे प्रकार २

वाढणी
दोन माणसांना एक वेळ

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

दह्यातली दाण्याची चटणी

वाढणी
३-४

पाककृतीला लागणारा वेळ
15

जिन्नस

  • १ वाटी दाण्याचं कूट
  • १ वाटी दही
  • चवीप्रमाणे तिखट, मीठ, साखर

मार्गदर्शन

सोप्पं आहे. पंधरा मिनिटं म्हणजे म्होप झाली...

दाण्याचं कूट, दही एका वाडग्यात घ्यायचं. मस्तपैकी कालवायचं. ते करत असताना चवीप्रमाणे लाल तिखट, मीठ आणि साखर घालावी, परत कालवावं. आणि काय??

?
?
?
?

मिटक्या मारत, पोळी पासून ते धिरड्यापर्यंत कशाच्याही बरोबर खावं!

शहाजी भोसल्यांविषयी काही माहिती हवी आहे

शहाजींचा जन्म कधी झाला?
जिजाबाईशी लग्न कधी झाले?
त्यांचा मृत्यू कधी झाला?
शहाजी, जिजाबाई व शिवाजी यांची शेवटची भेट कधी झाली?


 

कोथिंबीर वड्या

वाढणी
२ जणांसाठी

पाककृतीला लागणारा वेळ
30

जिन्नस