"आई मला थोडे पैसे हवे आहेत. दंड विकत घेण्यासाठी", मनोहर आईला विनंती करत होता.
पद्माकर व दिनकर यांनी पण मनोहरच्या स्वरात स्वर मिसळत आम्हाला पण दंड हवा अशी मागणी केली होती.
"अरे पण कशाला हवा तुम्हाला दंड?", लक्ष्मीबाईंनी औत्सुक्याने विचारले, "तुम्ही कोणासोबत मारामारी करायच्या विचारात आहात की काय?"