इंग्रज का गेले?

परवाच "गांधी-सावरकर", "टिळक-आगरकर" व अश्याच इतर गोष्टींवर चर्चा/वादविवाद करीत असताना एक प्रश्न पडला... अनेकांनी अनेक उत्तरे दिली परंतु अजुनही समाधान झाले नाही...


प्रश्न असा की: "इंग्रज भारत का सोडून गेले असावेत?"


  1. गांधीजींच्या अहिंसावादी सत्याग्रहाने त्यांचे मन द्रवले म्हणून?

  2. सर्व देशातील, एक झालेली जनता जर आता हिंसक बनली तर इथे आपला टीकाव लागणार नाही असे वाटून?

  3. कंटाळून?

  4. हा देश सोडण्यात त्यांचा काही फायदा होता म्हणून?

का इतर काही कारणे आहेत? मनोगतींचे काय म्हणणे आहे?