लोकसभेच्या निवडणुका अर्थात लोकशाहीचा वसंतोत्सव हे आख्यान दिसातासाने रंगू लागले आहे. कोण देशप्रेमी, कोण देशद्रोही, कोण शूरवीर, कोण पळपुटे, कोण भ्रष्ट, कोण दुष्ट, कोण सुष्ट, कोणी कुठे जावे नि जाऊ नये, चौबाजूंनी नुसती कारंजी उडताहेत.
भारतात होणाऱ्या कुठच्याही निवडणुकांत मतदानाची टक्केवारी जाहीर केली जाते आणि तत्परतेने दुर्लक्षितही.