१) अध्यात्माचा साधा अर्थ आपण मुळात काय आहोत हे समजणे असा आहे. जे तुम्हाला समजेल ते तुम्ही आत्ता, या क्षणी आहातच त्यामुळे अध्यात्म म्हणजे तुमचा तुम्हाला पत्ता सांगण्या सारखे आहे. जीवनातली सगळी निराशा, टेन्शन्स, असहायता आणि जे जे काही म्हणून उणे आहे ते आपण मुळात कोण आहोत हे न समजल्यामुळे आहे. आपल्या मूळ स्वरूपाला सत्य, शाश्वत, अमृत, शून्य, आत्मा, निराकार, अनंत, अपरिवर्तनीय अशी अनेक नांवे आहेत पण सगळ्याचा अर्थ एकच आहे. त्यामुळे अध्यात्मात शब्दाला महत्त्व नसून कळण्याला आहे.