एका उन्हाची कैफियत

एका उन्हाची कैफियत


मराठी गझलांची एक आशयघन मैफल
सादरीकरण:  कवी-गझलकार चंद्रशेखर सानेकर आणि संगीतकार-गायक मिथिलेश पाटणकर.
या कार्यक्रमात फक्त चंद्रशेखर सानेकर यांनी लिहिलेल्या आणि मिथिलेश
पाटणकर यांनी स्वरबद्ध केलेल्या गझलांचे सादरीकरण होईल. सानेकरांचे

३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान

अस्तित्वातल्या कोणत्याही घटनेचा मागोवा घेऊन तिचा कार्य-कारण भाव बुद्धीने शोधला जाऊ शकतो पण एका ठराविक मर्यादे नंतर बुद्धी उत्तर शोधू शकत नाही तिथे रहस्य सुरू होते. सफरचंद खाली का पडते याचा उलगडा न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून केला पण गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? हे त्याला सांगता आले नाही आणि ते कोणालाही सांगता येणार नाही कारण ते रहस्य आहे.

ह्या अस्तित्वाची निर्मिती कशी झाली याला एकमेव आणि अत्यंत अलौकिक उत्तर अष्टावक्रानी आपल्या गीतेत दिले आहे. तो म्हणतो ह्याची सुरुवात झालेली नाही हे सुरुवाती पासून असेच आहे.  

संस्कृत विकिपीडियाचे आवाहन

संस्कृत विकिपीडियाच्या अस्तित्वाची माहिती संस्कृतप्रेमींना जवळपास नसल्यात जमा आहे. विकिपीडिया संकल्पनेचे आपण समर्थन करावेत असे नाही.  संस्कृत विकिपीडियाच्या अस्तित्वाची माहिती संस्कृतप्रेमींना व्हावी या दृष्टीने संस्कृत विकिपीडियाची लिंक दुवा आपल्या अनुदिनी आणि संकेतस्थळावर द्यावा

अर्थात हि  तुमच्या पानाचे दुवे संस्कृत विकिपीडियाने स्वीकारावेतच असा आग्रह धरू नये, कारण विकिपीडियाच्या संकल्पनेत त्यास वाव देणे शक्य होईलच असे सांगता येत नाही

सध्या संस्कृत विकिपीडियाकरिता लोगो लेखन चर्चा चालू आहे त्यात आपण सहभाग घेतला तर आनंद वाटेल.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -५

चुडामणींच्या केबिनमध्ये इन्स्पेक्टर (अर्थातच) प्रधान, चुडामणी आणि शिक्षण संस्थेचे आणखी एक दोन पदाधिकारी सचिंत मुद्रेने बसले होते. सगळ्यांच्या मनात काळजी, भीती आणि खेद होता - जो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. एक दीर्घ सुस्कारा टाकून चुडामणींनी खिडकीतून बाहेर नजर टाकली. इन्स्टिट्यूटचं आवार तिथून स्पष्ट दिसत होतं. निम्मा अधिक इमारतीचा भाग जळालेल्या अवस्थेत होता. उरलेल्या भागाचं प्रचंड नुकसान झालेलं कळत होतं. काचा फुटून शतशः विदीर्ण झालेल्या, बाकं बाहेर आणून उलटी फेकलेली. इतर शैक्षणिक साहित्यही संपूर्ण विल्हेवाट लावलेल्या अवस्थेत बाहेर फेकलं गेलेलं दिसत होतं.

इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी -४

बऱ्याच वेळा नाईलाजयुक्त आदरानं आणि व्यासंग वाढावा म्हणूनही दिवेकर सर शिक्षणचुडामणींच्या तासाला बसत. एक दिवस चुडामणी 'वार्षिक हिशेब व ताळेबंद हिशेब तपासनिसाकडून मंजूर कसे करून घ्यावे' याचं विवेचन करत होते. सोयीस्कर हिशेबांची मंजुरी महत्त्वाची असते हे त्यांचं मत. "संस्था, मंडळं, संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांना ऑडिटरचं भावविश्व, त्यांच्याशी बोलताना हळूहळू उलगडत गेलं पाहिजे. नेमकं उमगलं पाहिजे." ते सांगत होते. चुडामणींचं हे वाक्य ऐकून दिवेकर सरही गोंधळले. वर्गातल्या एकाही विद्यार्थ्याच्या कानावर भावविश्व हा शब्द पडला असण्याची शक्यता नव्हती. सर्वांनीच गोंधळून चुडामणींकडं पाहिलं.