भर उन्हाळ्यात कुठल्याही गिरीभ्रमणाला जायचे म्हणजे बहुतेकांच्या अंगावर काटा येतो. का न यावा? सकाळी आठचे ऊन झेलताना शहरात दम निघतो तर उघड्यावाघड्या डोंगरांवर काय होईल?
पण नको ते उद्योग करण्यातले पदव्युत्तर प्रशिक्षण घेतलेले असल्याने या उन्हाळ्यातही गिरीभ्रमणाचा नाद मी सोडला नाही. लोहगड हा तसा पाऊण दिवस पुरणारा किल्ला. तो झटपट करता येईल का हा विचार मनात आला, आणि त्याला प्रश्नात्मक उत्तरही मिळाले, "का नाही?"